Sahyadri Forest : 'सह्याद्री'तलं पाणी घेतो; आता जंगलातून येणारे प्राणीही स्वीकारू

Sahyadri Forest : भारताच्या पश्‍चिमेकडे पसरलेली १६०० किलोमीटरची पर्वतरांग म्हणजे पश्‍चिम घाट, जो ‘सह्याद्री’ म्हणून ओळखला जातो.
Sahyadri Forest
Sahyadri Forestesakal
Updated on
Summary

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून येणारे पाणी आपल्याला वर्षभर पिण्यासाठी व शेतीसाठी मिळत असते. त्याचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे.

‘सह्याद्री’च्या जंगलात (Sahyadri Forest), डोंगरात उगम पावणाऱ्या नद्यांनी समृद्ध झालो. इथलं पाणी नद्यांतून, कालव्यांतून आपण सर्वत्र नेले. त्यावर विकास साधला, आता या जंगलातून, डोंगरातून येणारे प्राणीही आपण स्वीकारले पाहिजेत. आपल्याला पाणी देणाऱ्या बहुतांश नद्यांचा उगम सह्याद्री पर्वतावरील जंगलातून झाला आहे.

भारताच्या पश्‍चिमेकडे पसरलेली १६०० किलोमीटरची पर्वतरांग म्हणजे पश्‍चिम घाट, जो ‘सह्याद्री’ म्हणून ओळखला जातो. पश्‍चिम घाट (Paschim Ghat) हा सर्वसाधारण १०० किलोमीटर रुंदीचा असून त्याची व्याप्ती महाराष्ट्र, गुजरात सीमेवरून ते भारताच्या दक्षिण टोकापर्यंत आहे.

-अजितकुमार पाटील, मानव व वन्यजीव अभ्यासक

पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो. त्यामुळे ढग उंचीवर जातात, थंड होतात आणि पाऊस पडतो. घाटातील घनदाट जंगले पावसाला मदत करतात. जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्या स्वरुपात हवेत सोडण्यास मदत करतात. त्यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा खूप जास्त पाऊस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या येथेच उगम पावतात. या तीन नद्या पूर्ववाहिनी आहेत. पुढे जाऊन त्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात.

Sahyadri Forest
New Mahabaleshwar Project : नवीन महाबळेश्वर : पर्यटनाच्या शाश्‍वत वाटा

आपला सांगली जिल्हा व शेजारील जिल्ह्यांत पिण्यासाठी वर्षभर पाणी देणाऱ्या नद्या म्हणजे कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा. या पर्वतरांगेवर पडणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी धरणामध्ये वर्षभर साठवून त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व शेतीसाठी केला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी मिळत असल्यामुळेच आपल्याकडील शेती ही सुजलाम् सुफलाम् झाली आहे. या सर्व पाण्याचे उगमस्थान सुरक्षित राहावे, म्हणून त्या भागाला ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केलं गेलं आहे. त्यावरील जंगलांना अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्य, दाजीपूर, राधानगरी अभयारण्य परिसरातून जवळपास १७ उपनद्या उगम पावतात.

त्यातील प्रमुख नदी कृष्णामाई आहे. तिच्या प्रमुख उपनद्या कोयना, वारणा, पंचगंगा या आहेत. पावसाळ्यात पडणारा प्रचंड पाऊस या पर्वत रांगेत कोसळतो. या पावसाचे पाणी हे डोंगरात मुरते, उरलेलं पाणी हे दरीतून वाहत नदीपात्रात मिसळते. डोंगरात शोषून घेतलेलं पाणी हे नंतर वर्षभर झऱ्यावाटे हळूहळू नदीपात्रात येत राहतं. त्यामुळे या नद्या बारमाही वाहत राहतात. आपल्याला वर्षभर पाण्याची कमतरता भासत नाही.

नद्यांचे उगम सुरक्षित राहावे, परिसरातील जंगल हे टिकून राहावे, डोंगर बोडके होऊ नयेत, याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. ‘सह्याद्री’तील जंगल हे एक परिपूर्ण म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वांत मोठ्या वारसास्थळातील हे एक आहे. त्याला जपलं पाहिजे. जंगलावरील अतिक्रमणे रोखली पाहिजेत, तरच पश्‍चिम घाटातून मिळणार शुद्ध पाणी आपण वाचवू शकू.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून येणारे पाणी आपल्याला वर्षभर पिण्यासाठी व शेतीसाठी मिळत असते. त्याचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. मोठा कालवा तयार करून हे जंगलातील पाणी आपल्या शेतीसाठी माळरानावर वळवले आहे. त्याचा स्वीकार केला आहे. मात्र यासह जंगलातील काही प्राणी हे आपल्या शेतीत आले आहेत. त्यांचा स्वीकार पण आपण केला पहिजे. कारण शेतीसाठी जे पाणी आपण आणलेलं आहे, हे त्या वन्य प्राण्यांच्या जमिनीतून, त्यांच्या अधिवासातून घेऊन आलो आहोत. जंगलातील पाण्यासोबत जंगलातील प्राण्यांचाही स्वीकार केलाच पाहिजे. सोळशी, कांदाट, मोरणा, वांग, कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी, सरस्वती अशा बऱ्याच लहान-लहान नद्यांचा उगम आपल्या ‘सह्याद्री’तील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.