Railway : वारकऱ्यांचीही झाली सोय! आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी मिरजेतून तब्बल २४ गाड्या

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर व पुणे विभागाकडून १५ ते २१ जुलैपर्यंत २४ विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत.
railway
railwaysakal
Updated on

मिरज - पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर व पुणे विभागाकडून १५ ते २१ जुलैपर्यंत २४ विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत, तर कर्नाटकातील बंगळूर ते पंढरपूरदरम्यान तीन विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये मिरजेतून धावणाऱ्या गाड्या पुढील प्रमाणे ः मिरज-पंढरपूर गाडी पहाटे ५ वाजता सुटेल. मिरज-कुर्डुवाडी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटेल. १५ जुलै रोजी मिरज-पंढरपूर पहाटे ५ वाजता सुटेल.

मिरज-कुर्डुवाडी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटेल. मिरज-पंढरपूर -पुणे ही गाडी कुर्डुवाडी मार्गे सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. १६ जुलै मिरज-पंढरपूर पहाटे ५ वाजता, मिरज-कुर्डुवाडी दुपारी ३ : १० वाजता. मिरज-पंढरपुर-पुणे ही गाडी कुर्डुवाडी मार्गे सायंकाळी ४ वाजून ४५ वाजता. १७ जुलै रोजी मिरज-पंढरपूर पहाटे ५ वाजता, मिरज कुर्डुवाडी दुपारी ३ : १० वाजता.

मिरज-पंढरपूर-पुणे ही गाडी कुर्डुवाडी मार्ग सायंकाळी ४ वाजून ४५ वाजता. १८ जुलैला मिरज-पंढरपूर पहाटे ५ वाजता मिरज-कुर्डुवाडी दुपारी ३ : १० वाजता. मिरज-पंढरपूर-पुणे ही गाडी कुर्डुवाडी मार्ग सायंकाळी ४ वाजून ४५ वाजता. मिरज-नागपूर दुपारी १२ : ५५ वाजता. १९ जुलैला मिरज-पंढरपूर पहाटे ५ वाजता, मिरज-कुर्डुवाडी दुपारी ३ : १० वाजता.

मिरज-पंढरपूर-पुणे ही गाडी कुर्डुवाडी मार्गे सायंकाळी ४ वाजून ४५ वाजता. मिरज-नागपूर दुपारी १२ : ५५ वाजता. २० जुलै रोजी मिरज-पंढरपूर पहाटे ५ वाजता, मिरज कुर्डुवाडी दुपारी ३ : १० वाजता. मिरज-पंढरपूर-पुणे ही गाडी कुर्डुवाडी मार्ग सायंकाळी ४ वाजून ४५ वाजता. २० जुलैला मिरज-पंढरपूर पहाटे ५ वाजता, मिरज-कुर्डुवाडी दुपारी ३ : १० वाजता सुटेल.

कर्नाटकच्या वारकऱ्यांची सोय

कर्नाटकातून धावणाऱ्या तीन गाड्या धावतील. यात १५ जुलै रोजी बंगळूर-पंढरपूर गाडी ०६२९५ बंगळूर रेल्वे स्थानकाहून रात्री १० वाजता निघणार आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ ला पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०६२९६ पंढरपूर - बंगळूर पंढरपूर रेल्वे स्थानकाहून संध्याकाळी १० वाजता निघणार व दुसऱ्या दिवशी बंगळूर रेल्वे स्थानकावर दुपारी १२ : ३० वाजता पोहचणार आहे.

१६ जुलैला गाडी क्र. ०६२९७ बंगळूर-पंढरपूर बंगळूर रेल्वे स्थानकाहून रात्री १० वाजता निघणार व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६. २० वाजताला पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. १७ जुलै रोजी गाडी क्र. ०६२९८ पंढरपूर- बंगळूर पंढरपूर रेल्वे स्थानकाहून सायंकाळी ८ वाजता निघणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी ३.१० वाजता सर एम विश्वेश्वरय्या बंगळूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

या गाडीला टुमकूर, गुब्बी, निटूर, संपिंगें रोड, टीपटूर, अरसिकेरे, बिरुर जं., चिकजाजूर, दावणगिरी, हरिहर, राणीबेन्नूर, हावेरी, कराजगी, हुबळी, धारवाड,अलनावर, लोंढा जं., खानापूर, बेळगावी, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, सांगोला, पंढरपूर थांबे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com