फुटीनंतरही पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा बालेकिल्ला भक्कम; मोदींची लाट असतानाही जिंकल्या 'इतक्या' जागा

राज्यपातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यातही उमटले.
Ashok Chavan Resigns Congress
Ashok Chavan Resigns Congressesakal
Updated on
Summary

चव्हाण यांच्या पाठोपाठ पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसची पडझड होईल अशी शक्यता होती; पण सद्य:स्थितीत तरी काँग्रेसचा हा गड अभेद्य आहे.

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा (Ashok Chavan Resigns Congress) ‘हात’ आज सोडल्यानंतरही काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा भक्कम आहे. जिल्ह्यात विधानसभेचे दहापैकी चार व विधानपरिषदेचे दोन आमदार काँग्रेसचे आहेत. यापैकी कोणीही पक्षांतर करण्याची शक्यता नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

राज्यपातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत जिल्ह्यातील पक्षाचे दोन्ही खासदार आणि एकमेव आमदारांसह एक-दोन माजी आमदारही गेले.

Ashok Chavan Resigns Congress
राज्यातील 20 ते 22 आमदारांसोबत स्वत: बोललोय, ते कोठेही जाणार नाहीत; सतेज पाटलांनी दिली महत्त्वाची अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसमधील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर ‘शरद पवार एके पवार’ म्हणणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह एकमेव आमदार राजेश पाटील, पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष, आजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह ढीगभर नेते अजित पवार यांच्यासोबत गेले. पण, त्यामुळे राष्ट्रवादीची जिल्ह्यातील अवस्था एकदम कुमकुवत आहे.

शिवसेना, राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसमध्येही धमाका होण्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. राज्यपातळीवरील काँग्रेसचे काही नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे समजत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसची साथ सोडताना आमदारकीचा राजीनामा देत संभाव्य भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्याच जिल्ह्यातील अमर राजुरीकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या पाठोपाठ पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसची पडझड होईल अशी शक्यता होती; पण सद्य:स्थितीत तरी काँग्रेसचा हा गड अभेद्य आहे.

Ashok Chavan Resigns Congress
कर्नाटक विधानसभेत भाजपच्या 'जय श्रीराम'ला काँग्रेस आमदारांनी दिलं 'जय भीम'च्या घोषणेनं उत्तर

मोदींची लाट असताना जिंकल्या जागा

२०१४ च्या विधानसभेत कोल्हापुरात काँग्रेसचा एकही आमदार नव्हता; पण २०१९ मध्ये राज्यात आणि देशात मोदींची लाट असताना काँग्रेसने विधानसभेचे चार, तर विधान परिषदेच्या दोन जागा जिंकत हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले होते. श्री. चव्हाण यांच्या बंडखोरीनंतरही जिल्ह्यातीलच नव्हे तर सांगली, सातारा जिल्ह्यांतीलही कोणी मोठा नेता त्यांच्यासोबत न गेल्याने हा बालेकिल्ला अभेद्य आणि भक्कम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.