सांगली रस्त्याकडे जाताना एका बँकेसमोर अनेक खड्डे पडले आहेत. नेर्ले हद्दीतील ‘साई सम्राट’समोर नवीन महामार्ग केला आहे.
नेर्ले : आशियाई महामार्गाची (Asian Highway) सध्या दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता दुरुस्ती करावी कशी, असा प्रश्न सध्या महामार्ग प्रशासनासमोर आहे. पावसाने महामार्गाची (Sangli Rain) पुरती वाट लागली आहे. ‘खड्डेच खड्डे चोहीकडे, वाहन नेऊ कुणीकडे’ अशा विचारात चालकांना वाहन चालवत जावे लागत आहे. पेठ, नेर्ले, कासेगाव, केदारगाव, मालखेड या भागात महामार्ग नव्हे, मृत्युमार्ग झाला आहे. अनेक वाहनचालक पर्यायी मार्गांचा अवलंब करीत आहेत.
आशियाई महामार्गावरील सेवा रस्ते व पर्यायी मार्गांची वाट लागली आहे. महामार्ग प्रशासन (Highway Authority) मात्र हतबल झाल्याचे चित्र आहे. रस्त्यावर खडी, मुरूम, माती टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाकडून होत असला तरी सध्याची परिस्थिती पाहता पुणे-मुंबई व कर्नाटकला जाणारा आशियाई महामार्ग बिकट बनला आहे. महामार्गावरील कामे व खड्डे जीवघेणे ठरत आहेत.
सांगली रस्त्याकडे जाताना एका बँकेसमोर अनेक खड्डे पडले आहेत. नेर्ले हद्दीतील ‘साई सम्राट’समोर नवीन महामार्ग केला आहे. पावसाळ्यात याच महामार्गावरून ओढ्यासारखे पाणी वाहत असल्याचे चित्र स्थानिकांना पाहायला मिळाले. नवीन काम करत असताना वाहतूक कोंडी होऊ नये, असा कोणताही पर्यायी महामार्ग प्रशासनाने केलेला दिसून येत नाही. त्यामुळे महामार्गावर वारंवार प्रवासात वाहतुकीची कोंडी होते. यात अनेक रुग्णांचे हाल झाले. येथील मळ्याच्या कमानीपासून पुढे नेर्लेकडे जाणाऱ्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
नेर्लेतील नव्याने उभारलेल्या पुलाखाली रस्ते व्यवस्थित नाहीत. महामार्गावर लावलेले सिमेंटचे बॅरिकेड्स धोकादायक आहेत. ते अस्ताव्यस्त आहेत. केदारगाव हद्दीत हजारो खड्डे पडले आहेत. येथील पुलाखाली पाण्याचे तळे निर्माण झाले होते. कासेगावच्या जवळ विविध वळणमार्गाचे फलक लावले आहेत. अचानक वळण असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. उकरलेले मोठे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. शेतीतून अवजारे अथवा जनावरांचा चारा घेऊन येताना शेतकऱ्यांना त्रासाला समोरे जावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.