तब्बल 25 हजार चौरस फूट जागेत साकारली प्रभू श्रीरामांची प्रतिअयोध्या; 167 खांब, 20×39 चा गाभारा अन् बरंच काही..

मिरजेतील तालुका क्रीडा संकुल येथे २५ हजार चौरस फूट जागेत अयोध्यासारखे हुबेहूब असे राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) साकारण्यात आले आहे.
Miraj Ram Mandir
Miraj Ram Mandiresakal
Updated on
Summary

मंदिरात एकाच वेळी ३०० राम भक्त दर्शन घेऊ शकतात. तसेच मंदिरात उभारलेल्या प्रत्येक खांबांवर गरुड, सिंह, हनुमान, जय-विजय मूर्तीची शिल्परेखा कोरली आहेत.

मिरज : तब्बल २१ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर २०० कारागिरांच्या मदतीने मिरजेतील तालुका क्रीडा संकुल येथे २५ हजार चौरस फूट जागेत अयोध्यासारखे हुबेहूब असे राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) साकारण्यात आले आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर हा सोहळा मिरजेतील प्रति राम मंदिरात होणार आहे.

पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या 'व्हाईट लोट्स क्रिएटिव्ह स्टुडिओ'चे (White Lotus Creative Studio) बाबासाहेब कांबळे यांनी २०० सहकाऱ्यांसह प्रतिकात्मक मंदिर उभारण्यासाठी परिश्रम घेतले. यासाठी २१ दिवसांच्या कालावधीनंतर अखेर अयोध्येतील हुबेहूब असे प्रति राम मंदिर मिरजनगरीत तयार झालेय.

Miraj Ram Mandir
Miraj Ram Mandir

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, भारतीय संस्कृतीचा पूर्णतः वापर करून ऐतिहासिक गोष्टीची सांगड घालत उभारणी केली आहे. २५ हजार चौरस फूट जागेत १६७ खांबांच्या आधारे अयोध्यासारखे तीन मजली मंदिर (Miraj Ram Mandir) उभारले आहे. तर, गाभारा २०×३९ आकाराचा साकारला असून पाच फुटांचा चौथरा उभारला आहे. त्यावर २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मंदिराची उंची ६५ फुटांपर्यंत आहे.

Miraj Ram Mandir
20 हजार चौरस फूट जागेवर मिरजेत साकारतेय राम मंदिराची भव्य-दिव्य प्रतिकृती; 1 कळस, 22 शिखरे, 150 कमानी, 167 खांबांची निर्मिती

मंदिरात एकाच वेळी ३०० राम भक्त दर्शन घेऊ शकतात. तसेच मंदिरात उभारलेल्या प्रत्येक खांबांवर गरुड, सिंह, हनुमान, जय-विजय मूर्तीची शिल्परेखा कोरली आहेत. तर प्रवेशद्वारावर बलाढ्य हत्ती स्वागतासाठी सज्ज आहेत. यामुळे भारतीय संस्कृतीस (Indian Culture) साजेसे असे हे मंदिर उद्या होणाऱ्या अयोध्येतील प्राण प्रतिष्ठापनेसाठी सज्ज झाले आहे. विविध शिल्पकला कोरलेले हे राम मंदिर अयोध्येची प्रचिती देत आहे.

Miraj Ram Mandir
Miraj Ram Mandir

याबाबत व्हाईट लोट्स क्रिएटिव्ह स्टुडिओचे बाबासाहेब कांबळे म्हणाले, शिखराच्या बांधकामावरून मंदिराची रचना तयार करावी लागते. सध्या अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर प्रत्येकाच्या मना-मनात आहे. त्यानुसार हे मंदिर व्हावे यासाठी धडपड सुरू होती, त्यानुसार अयोध्येतील मंदिराचा अभ्यास करून मिरजेत प्रतिकात्मक प्रतिअयोध्या साकारली आहे. कमी कालावधीत मंदिर उभारणीचे ध्येय गाठून हे साध्य केले.

Miraj Ram Mandir
'माझे आणि प्रभू श्रीरामांचे वेगळेच ऋणानुबंध, कारण माझा जन्म रामनवमी दिवशीचा'; असं का म्हणाले मुश्रीफ?

प्रणित फायबर वर्क्स, गोकुळ शिरगांवचे (Pranit Fiber Works Gokul Shirgaon) पांडुरंग भोसले म्हणाले, कोल्हापूरच्या ‘व्हाईट लोटस् क्रीएटिव्ह स्टुडिओ’च्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिराची भव्य-दिव्य प्रतिकृती मिरजेत साकारली आहे. यासाठी 'प्रणित फायबर वर्क्स'च्या कारागिरांनी रात्रंदिवस परिश्रम घेत फायबर कास्टिंग, फिनिशिंग आणि रंगकाम पूर्ण केले. गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरु होते, ते आता पूर्णत्वाला आले आहे. भव्य-दिव्य असे हे मंदिर श्रीराम भक्तांना अयोध्येतील राम मंदिराची प्रचिती देणार आहे. त्यामुळे त्यांचा आनंद व्दिगुणित होणार आहे.

Miraj Ram Mandir
Miraj Ram Mandir

दरम्यान, शनिवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी क्रीडा संकुलवरील प्रति श्रीराम मंदिरची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. यामध्ये सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. तसेच मिरजकरांनी आणि जिल्हावासियांनी मिरजेतील श्रीरामाचे दर्शन घेण्याचे आवाहन केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, युवानेते सुशांत खाडे, सुरेश आवटी, बाबासाहेब आळतेकर, निरंजन आवटी, पांडूरंग कोरे, शशिकांत वाघमोडे, भैय्या खाडीलकर, संदीप आवटी, गणेश माळी, सागर वडगावे, गजेंद्र कुल्लोळी, अजिंक्य हंबीर, जयगोंड कोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Miraj Ram Mandir
Miraj Ram Mandir

'मंदिर वही बनायेंगे.. लेकिन तारीख नही बतायेंगे...'

मंदिर वही बनायेंगे...लेकिन तारीख नही बतायेंगे... या विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उत्तर देत त्याच ठिकाणी प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारून आणि २२ जानेवारी ही प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर करून विरोधकांची तोंडे बंद केली आहेत. तर, अयोध्येच्या धर्तीवर मिरजेत प्रति अयोध्या साकारली असून हुबेहूब असे प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारले आहे. यामुळे मिरजकरांना अयोध्या सारखेच येथून प्रभू श्रीरामाचे दर्शन होणार आहे.

-सुरेश खाडे, पालकमंत्री तथा कामगार मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.