Islampur : अनैतिक संबंधावरून चिडवल्याचा राग मनात धरून पाटोळेचा खून; धारदार शस्त्राने डोक्यात वार

खुनाची घटना घडल्यापासून पोलिस यंत्रणा मारेकऱ्यांना शोधत होती.
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

डाव्या बाजूच्या डोक्यावर, कानावर व उजव्या बाजूस खांद्यावर धारदार शस्त्राने जखमी केले होते.

इस्लामपूर : अनैतिक संबंधावरून वारंवार चिडवल्याचा राग मनात धरून बेरडमाची (ता. वाळवा) येथील बाजीराव मोहन पाटोळे (वय ४०, बेरडमाची) याचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित अजय ऊर्फ महादेव शहाजी चव्हाण (२२, बेरडमाची) याला न्यायालयानं पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीये.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेरडमाची गावच्या (Berdamachi Village) हद्दीतील कदम विहिरीजवळच्या शेतात खुनाची ही घटना घडली होती. मृत बाजीराव पाटोळे यांचा मुलगा हर्षद याने इस्लामपूर पोलिस (Islampur Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षदने दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव पाटोळे (वय ४०) हे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता घरी येऊन जेवणाचा डबा घेऊन गेले, ते परत आलेच नाहीत.

Crime News
Satara Police : 'तुझी खूप दादागिरी चाललीये'; पोलिसाचा पाठलाग करून लोखंडी पट्टी, लाकडी दांडक्याने मारहाण

सायंकाळी पावणेपाचला एका अनोळखी माणसाने वडील रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे हर्षदला सांगितले. त्यांच्या डाव्या बाजूच्या डोक्यावर, कानावर व उजव्या बाजूस खांद्यावर धारदार शस्त्राने जखमी केले होते. त्यांना एका खासगी वाहनातून रुग्णालयात नेले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

Crime News
Karad : मोराच्या अंगावरची पिसं उपसून काढली अन् व्‍हिडिओ केला शेअर; मध्‍य प्रदेशातील आरोपींना कराडात अटक

गुरुवारी (ता. ८) दुपारी खुनाची घटना घडल्यापासून पोलिस यंत्रणा मारेकऱ्यांना शोधत होती. लोकांमधून वेगवेगळी कारणे पुढे येत आहेत. पोलिसांचे पथक गावातच तळ ठोकून होते. गावातीलच एका बातमीदाराने एका संशयिताचे नाव पोलिसांना सांगितले.

Crime News
Kolhapur : दीड हजार सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू; हृदयद्रावक घटनेने हळहळ

त्या वरून संशयित अजय ऊर्फ महादेव शहाजी चव्हाण याला पोलिसांनी येळावी (ता. तासगाव) येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. काल न्यायालयात अजय चव्हाण याला हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण तपास करीत होते. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक अनिल जाधव, अरविंद काटे, चेतन माने, हवालदार अरुण पाटील, शरद बावडेकर, दीपक पाटील यांनी सहभाग घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.