बारामती: कृत्रीम बुध्दीमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) वापर करुन उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासोबतच टनेज देखील वाढू शकते ही बाब बारामतीत प्रत्यक्षात आली आहे. बारामतीत शरदचंद्र पवार आधुनिक ऊसशेती विस्तार प्रकल्प या अंतर्गत भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक ऊसशेतीचा प्रयोग बारामतीतील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, तसेच मायक्रोसॉफ्ट यांच्या वतीने राबवण्यात येत आहे.