Baramati Crime: लैंगिक अत्याचार प्रकरणी कराटे शिक्षकास वीस वर्षे सश्रम कारावास

Baramati Crime: अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी वीस वर्षे सश्रम कारावास
baramati minor sexual assault case
baramati minor sexual assault casesakal
Updated on

बारामती: अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी अमोल कृष्णा पांढरे (वय 27, रा. भिगवण, ता. इंदापूर) यास येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधिश ओ.ओ. शहापुरे यांनी मोक्सो कायदया अंतर्गत वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

baramati minor sexual assault case
Girl sexually assaulted in Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? बलात्कार की शारीरिक लगट?

संबंधित अल्पवयीन मुलगी अमोल पांढरे याच्याकडे कराटे शिकण्यासाठी जात होती. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वैराग येथे पळवून नेत तिच्यावर अत्याचार केला. त्या नंतर पोलिसांनी आरोपीसह पिडीत मुलीला ताब्यात घेतले.

विशेष सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी सरकारच्या वतीने खटला चालविला. या प्रकरणात 11 साक्षीदार तपासले गेले, पिडीत मुलगी, वैदयकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीच्या वतीने मुलगी स्वेच्छने आल्याचा युक्तीवाद केला गेला, मात्र अल्पवयीन मुलीची संमती कायद्याने ग्राह्य धरता येत नाही, यात पिडीतेची संमती नव्हती, आरोपी विवाहीत असताना त्याने हे कृत्य केले होते. आरोपीविरुध्द सबळ पुरावा सादर केला गेला.

या खटल्यात न्यायालयाने आरोपीला ठोठावलेली दंडाची रक्कम पिडीत मुलीस देण्याचा व सदरची रक्कम तुटपुंजी असल्याने जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिवांनी पिडीतेस कायदयान्वये नुकसान भरपाई रक्क्म देण्याची शिफारस न्यायाधिशांनी केली.

या खटल्यात अॅड. स्वप्नील जगताप, फौजदार निश्चल शितोळे, कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव नलवडे, फौजदार विजय झारगड यांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.