Shirala Nag Panchami : नागपंचमीसाठी शिराळा नागरी सज्ज; बंदोबस्ताला तब्बल 650 पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात

Battis Shirala Nag Panchami 2024 : नागपंचमीपूर्वी प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
Battis Shirala Nag Panchami 2024
Battis Shirala Nag Panchami 2024 esakal
Updated on
Summary

वनविभागातर्फे व्हिडिओ चित्रीकरण, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

शिराळा : येथे शुक्रवारी (ता. ९) होणाऱ्या नागपंचमीची (Battis Shirala Nag Panchami) तयारी पूर्ण झाली आहे. शिराळ्यात येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी शिराळा नागरी सज्ज झाली आहे. प्रशासनाने पोलिस (Police) व वन विभाग अशा ६५० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने शिराळा शहर व मिरवणूक मार्गासह परिसरातील गावांत संचलन केले.

नागपंचमीपूर्वी प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दहा गस्ती पथके आहेत. वनविभागातर्फे व्हिडिओ चित्रीकरण, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पोलिस प्रशासनाकडून १ पोलिस उपाधीक्षक, पोलिस निरीक्षक ११, सहायक पोलिस निरीक्षक ३७, पोलिस कर्मचारी ४१०, वाहतूक पोलिस कर्मचारी ५०, ध्वनिमापक यंत्र १७, व्हिडिओ कॅमेरे १३, एक दंगलविरोधी पथक, एक घातपातविरोधी पथक, एक श्वान पथक व बॉम्बशोध पथक तैनात करण्यात आले आहे.

Battis Shirala Nag Panchami 2024
Satej Patil : 'शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग म्हणजे सरकारची लाडका कंत्राटदार योजना'

शिराळा आगारातर्फे ३० व बाहेरील आगाराच्या अन्य गाड्यांचे नियोजन केले आहे. शिराळा-इस्लामपूर मार्गावर १६, शिराळा-बांबवडे मार्गावर १४, शिराळा-कोडोली व शिराळा वाकुर्डे मार्गावर ३, शिराळा-मणदूर मार्गावर १८ फेऱ्यांचे नियोजन केले आहेत. शिराळा-इस्लामपूर जाणारी वाहतूक शिराळा येथून कापरी, कार्वे, लाडेगावमार्गे व इस्लामपूर अशी जाईल. शिराळा येथे येणारी वाहतूक पेठ नाकामार्गे एकेरी केली आहे. साई मंगल कार्यालय, शिराळा-कोकरूड व बांबवडे मार्गावर विश्वासराव नाईक कॉलेज, वाकुर्डे-शिरशी मार्गावर पाडळी रस्ता येथे तात्पुरते बस स्थानक सुरू केले आहे.

‘महावितरण’ने नागपंचमीला अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहण्यासाठी पर्यायी फिडरवर खेड फाटा व बिरोबा मंदिर येथे नवीन ए. बी. स्वीच कार्यान्वित केले आहे. शिराळा बसस्थानक, कापरी नाका, अंबामाता मंदिर, मरिमी चौक, नायकुडपुरा, लक्ष्मी चौक, तळीचा कोपरा, नगरपंचायत, गुरुवार पेठ, नवजीवन वसाहत येथे प्रत्येक ठिकाणी आवश्यकतेनुसार १ अभियंता व दोन ते तीन विद्युत कर्मचारी नियुक्त केलेत. आरोग्य विभागातर्फे नगरपंचायत, बसस्थानक, शनिमंदिर, व्यापारी असोसिएशन, समाज मंदिर, नायकूडपुरा, तळीचा कोपरा येथे सात आरोग्य पथके तयार ठेवली आहेत.

Battis Shirala Nag Panchami 2024
Sangli Politics : चंद्रहार पाटलांचा पराभव करणाऱ्या खासदार विशाल पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

सर्पदंशावरील लस उपलब्ध करण्यात आली आहे. खेळणी, खाद्यपदार्थ, पाळणे व मनोरंजनाची अन्य दुकाने दाखल झाली आहेत. वनविभाग (सांगली) यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार सापाचे संरक्षणासाठी जनजागृतीसाठी कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन, प्रबोधनी (कुंडल) च्या ५५ प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिराळा व परिसरातील गावांत संचलन केले. शिराळा शहर, कापरी-कार्वे, लाडेगाव, ऐतवडे बुद्रुक, कुरळप, मरळनाथपूर - रेठरेधरण, गोळेवाडी, नायकलवाडी, ओझर्डे-सुरुल, भटवाडीमार्गे करून शिराळा येथे संचलनाची सांगता केली. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, महांतेश बगले व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.