सावधान विषयुक्त स्ट्रॉबेरीपासून; पाचगणीत येथे मिळते विषमुक्त

सावधान विषयुक्त स्ट्रॉबेरीपासून; पाचगणीत येथे मिळते विषमुक्त
Updated on

पाचगणी (जि. सातारा) : आजचा शेतकरी आधुनिक पद्धतीने विविध रासायनिक खते, औषधांचा भरमसाट वापर करून उत्पादन व आपले आर्थिक उत्पन्न वाढवत आहे. परंतु, ग्राहकांच्या आरोग्याचे काय ? याचे उत्तर देण्यासाठी अपवाद गोडवली (ता. महाबळेश्‍वर) गावचे लक्ष्मण रामचंद्र मालुसरे (वय 50) हे आहेत. ते गेली 19 वर्षे सातत्याने जैविक खते, औषधांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने उत्तम प्रकारे विषमुक्त शेती (स्ट्रॉबेरी, वाटाणा, गहू, फराशी) करत आहेत. 

पाचगणी आणि महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीचे जन्मग्राम असून, या ठिकाणी पूर्वी ऑस्ट्रिया, बंगळूर व निग्रो जातीची स्ट्रॉबेरी केली जात असे. 1992 मध्ये कॅलिफोर्नियाच्या स्ट्रॉबेरीने या परिसरात पाऊल टाकले अन्‌ जुन्या जातीच्या स्ट्रॉबेरीची मक्तेदारी संपुष्टात आली. वजनाला अधिक, कमळाच्या आकाराची व रसाळ असलेल्या कॅलिफोर्नियाच्या स्ट्रॉबेरीची मागणी वाढली. शेतकऱ्यांनी सर्रास नगदी उत्पन्न देणाऱ्या बटाट्याला पूर्णविराम देऊन स्ट्रॉबेरीकडे कल दिला. आजचा शेतकरी बदलत्या काळानुसार आधुनिक पद्धतीने विविध रासायनिक खते, औषधांचा भरमसाट वापर करून उत्पादन व आपले आर्थिक उत्पन्न वाढवत आहे. परंतु, ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर राहिला असताना कसलाही आर्थिक फायदा न बघता "थोडं करा, पण चांगलं करा' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून

नक्की वाचा -  सातार्‍यातील 160 प्रकल्पांना ब्रेक

श्री. मालुसरे हे विषमुक्त शेती करत आहेत. त्यांना कृषी विभागाचे सहकार्य मिळत आहे. त्यांची स्ट्रॉबेरी खायला गोड आहे. तिचा टिकाऊपणाही जास्त, तसेच किंमत चांगली मिळत आहे. उत्कृष्ट उत्पादन, आरोग्याला फायदेशीर आणि केलेल्या कष्टाचे मोल झाले पाहिजे, हे ब्रीद त्यांनी उराशी बाळगून ते नैसर्गिक शेती करत आहेत. 
सेंद्रिय शेतीचे फायदे सांगताना श्री. मालुसरे म्हणाले, ""ही फळे अगदी ताजी टवटवीत राहतात. फळांना टिकाऊपणा, अधिक चविष्ट आणि आरोग्याला फायदेशीर, दरसुद्धा किफायतशीर मिळतो. फळे घेण्यासाठी ग्राहक स्वतःहून येतात.'' 

हेही वाचा -  महाबळेश्‍वरच्या नक्षीदार काठ्यांची एक्झिट ?
 

मालुसरे दांपत्याने खोडला दावा 

आजच्या बदलत्या युगात सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर सफल होत नाही, असा लोकांचा गैरसमज आहे. परंतु, मालुसरे दांपत्याने हा दावा खोडून काढला असून, अशा पद्धतीची शेती करण्यास जे कोणी तयार असेल त्यास सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.