Maratha Reservation : उपोषणकर्त्यालाच जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीसमोर बेडसह आणलं उचलून; पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण..

मराठा समाज आक्रमक झाला. यामुळे पोलिसांची मात्र तारांबळ उडाली.
Bedag Maratha Andolan Maratha Community
Bedag Maratha Andolan Maratha Communityesakal
Updated on
Summary

बेमुदत उपोषण करणाऱ्या वाळेकर यांनी अन्नत्याग केल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत होता.

आरग : बेडग येथील प्रकाश वाळेकर यांनी चार दिवसांपासून अन्नत्याग केला असून, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काल (ता. १) जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी बेडग येथून आरगच्या दिशेने जात असल्याचे समजताच सकल मराठा समाजाने (Maratha Community) बेडग - मिरज रस्त्यावर त्यांना घेराओ घातला.

Bedag Maratha Andolan Maratha Community
OBC Reservation : 'मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता ओबीसी आरक्षणासाठी कुणबी समाज करणार आंदोलन'

येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात त्यांची मोटार अडविली. यावेळी अन्नत्याग केलेल्या प्रकाश वाळेकर यांना भेटण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला. यामुळे पोलिसांची मात्र तारांबळ उडाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला; परंतु कार्यकर्त्यांनी मोटारीसमोरच बसून घोषणा दिल्या.

Bedag Maratha Andolan Maratha Community
Maratha Reservation साठी कोकणातून पहिला राजीनामा; काँग्रेसच्या 'या' नेत्यानं पक्षाला दिली सोडचिठ्ठी

बेमुदत उपोषण करणाऱ्या वाळेकर यांनी अन्नत्याग केल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यांना उभे राहता येत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भेटावे, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी भेटण्यास नकार देताच संतप्त कार्यकर्त्यांनी वाळेकर यांना बेडसह उचलून जिल्हाधिकाऱ्यांच्या मोटारीसमोर आणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.