बेडकिहाळ : येथे एका खासगी सहकारी संस्थेत दिव्यागांना कोविड प्रतिबंधक लस देत असल्याची माहिती टास्क फोर्स समितीला(Task Force Committee)मिळाली. यावेळी सत्ताधारी ग्राम पंचायत सदस्य (Gram Panchayat Member)व टास्क फोर्स कमिटीने त्वरित आरोग्य केंद्राला भेट देऊन खासगी संस्थेत लसीकरण करु नये, त्यास आपला विरोध असून सरकारी काम हे सरकारी आरोग्य केंद्रात केले पाहिजे, असा आग्रह आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडे आग्रह धरला. त्याची माहिती मिळताच जोल्ले गटातील नेते(Jolle Group) सदस्य व कार्यकर्त्यांनी त्वरित आरोग्य केंद्राकडे धाव घेत टास्क फोर्स कमिटीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच दोघांमध्ये बाचाबाची झाल्याने आरोग्य केंद्र परिसरात गोंधळ व तणाव निर्माण झाला.
राज्य सरकारतर्फे १८ वर्षावरील दिव्यांग, मतिमंद, अपंगाना कोविड-१९ लसीकरणास सुरवात झाली आहे. लसीकरणाचा श्रेयवाद घेण्यासाठी निपाणी मतदार संघात चुरस होत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळाले. येथील आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात बेडकिहाळ, शमनेवाडी, नेज, चांद शिरदवाड गावांचा समावेश आहे. दोन दिवसापासून राज्य सरकारच्या आदेशानुसार ज्या-त्या गावातील १८ वर्षावरील अपंग, मतिमंद नागरिकांना कोविड लस देण्याचे काम आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. लसीकरण राज्य सरकारच्या अंतर्गत न करता मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली येथील एका खासगी संस्थेत करून लसीकरणात श्रेयवाद घेत असल्याच्या आरोपाखाली सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान येथील जोल्ले गट, ग्राम पंचायत सदस्य व टास्क फोर्स समितीमध्ये वाद निर्माण झाला.
ग्राम पंचायत अध्यक्षा मेघा मोहिते यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटातील सदस्यांनी घटनेचा विरोध करून सरकारी काम हे कोणत्या खासगी संस्थेत न होता सरकारी आरोग्य केंद्रातच झाले पाहिजे, अशी मागणी करत आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना अडविले. यावेळी जोल्ले गटातील नेते व कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्रात धाव घेत हा विरोध मोडून काढून ठरलेल्या जागीच लसीकरण झाले पाहिजे असा आग्रह धरला. यातून वाद निर्माण होवून दोन्ही गटात बाचाबाची झाल्याने आरोग्य केंद्राच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सदलगा पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही गटातील कार्यकर्ते आपल्याच म्हणण्यावर ठाम राहिल्याने वाद वाढला.
घटनेची माहिती मिळताच चिक्कोडीचे मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी यांनी पोलिस फौज फाटा घेऊन आरोग्य केंद्र गाठले. यावेळी आरोग्य केंद्रातून टास्क फोर्स समितीच्या सदस्य व ग्राम पंचायत सदस्यांना बाहेर काढले. त्यानंतर हे लसीकरण ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या बाहेरील पार्किंगच्या जागेत करण्याचा निर्णय घेतला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे यांच्या उपस्थितीत येथील दिव्यांगांना कोविड लसीकरण झाले. यावेळी आरोग्य केंद्र व मंदिर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.