सायकल फेरी परवानगी प्रकरण; महाराष्ट्र एकीकरण समितीचा आंदोलनाचा इशारा

कोरोनाचे कारण पुढे करत १ नोव्हेंबरच्या मुख्य सायकल फेरीला परवानगी नाकारण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती
महाराष्ट्र एकीकरण समितीsakal
Updated on

बेळगाव : कोरोनाचे कारण पुढे करत १ नोव्हेंबरच्या मुख्य सायकल फेरीला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे त्यादिवशी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन करणारच अशी ठोस भूमिका मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली. धरणे आंदोलनाला देखील परवानगी देण्यात येणार नाही, अशी आडमुठी भूमिका पोलिसांनी घेतली असली तरी कोणत्याही परिस्थितीत धरणे आंदोलन होणारच असे पोलिस अधिकाऱ्यांना ठणकावून सांगण्यात आले.

१ नोव्हेंबर काळ्यादिना संदर्भात चर्चा करण्यासाठी मार्केटचे सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोलीस आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक पार पडली. १ नोव्हेंबरच्या मूक सायकल फेरीला परवानगी देण्यात यावी, यासाठी मध्यवर्ती समितीच्यावतीने पोलीस आयुक्तांकडे लेखी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र कोरोनाचा कारण सांगत मूक सायकलफेरीला परवानगी देण्यात येणार नाही. असे लेखी उत्तर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काल कळविण्यात आले होते. त्यामुळे किमान त्या दिवशी दिवशी सकाळी १० ते १ पर्यंत मराठा मंदिर येथे धरणे आंदोलनाला परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आज पुन्हा पोलिस आयुक्तांना देण्यात आले.

महाराष्ट्र एकीकरण समिती
सातारा : रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा ‘सलाईनवर’

त्यामुळे आज सायंकाळी पुन्हा मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या कार्यालयात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते. बैठकी दरम्यान पोलिसांनी समिती नेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांच्यावर दांडगाई करत कोणत्याही परिस्थितीत सायकल फेरी किंवा धरणे आंदोलनाला परवानगी देण्यात येणार नाही. कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यास गुन्हे दाखल केले जातील. अशी दमदाटीही यावेळी करण्यात आली.

१ नोव्हेंबर हा संपूर्ण सीमाभागात सुतक दिन म्हणून पाळला जातो. केंद्र सरकारने केलेल्या अन्यायाविरोधात दुखवटा म्हणून १ नोव्हेंबर दिवशी सायकल फेरीचे आयोजन केले जाते. गेल्या अनेक वर्षापासून शहरात सायकल फेरीची परंपरा कायम आहे. त्यामुळे यावर्षी सायकल फेरी नसली तरी किमान मराठा मंदिर येथे धरणे आंदोलनाला परवानगी देण्यात यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. मात्र धरणे आंदोलनाला देखील परवानगी देण्यात येणार नाही असे सांगितल्याने भले आमच्यावर गुन्हे दाखल करा पण धरणे आंदोलन होणारच अशी भूमिका यावेळी समितीचे नेत्याने ठोसपणे मांडली.

महाराष्ट्र एकीकरण समिती
कऱ्हाड : मालखेडला तीन ठिकाणी घरफोडी; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

बैठकीला पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, एसीपी सदाशिव कट्टीमनी, एसीपी चंद्रप्पा, गणपती गुडाजी यांच्यासह शहरातील सर्व पोलीस निरीक्षक मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, रंजीत चव्हाण- पाटील युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके विकास कलघटगी यांच्यासह इतर समिती नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.