बेळगाव : नगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ३०१ रिक्त जागांसाठी सोमवारी (ता.२७) मतदान (Voting) होणार आहे. यासाठी ९०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, २ लाख ५५ हजार ६११ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यापैकी १ लाख २८ हजार ७७५ पुरुष व १ लाख २६ हजार ८३५ महिला मतदार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक (Election) घोषित करण्यात आली असून, गेल्या दोन आठवड्यापासून मतदान होणाऱ्या पंचायतींत प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यासाठी पक्ष आणि संघटनेच्या पातळीवर मतदारांची मोट बांधणीला वेग आला होता. सोमवारी (ता.२७) रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान चालेल. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून तयारी करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांसाठी बंदोबस्त पुरविला आहे. बेळगाव जिल्ह्यातील १६ स्थानिक स्वराज्य संस्थांतील ३०५ जागांसाठी निवडणूक घोषित झाली होती. त्यापैकी चार प्रभांगात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. यामुळे ३०१ जागांसाठी ९०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात २२८ कॉंग्रेसचे उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. भाजपने २६८ जणांना आखाड्यात उतरविले आहे. ३७ धजदचे उमेदवार आहेत. बीएसपी ३, एमआयएम १, एएपी १८ व अपक्ष ३४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नगरस्थानिक स्वराज्य संस्थानिहाय मतदार
संस्थापुरुषमहिला*एकूण
कित्तूर६९४०७०६५*१४००५
एम.के.हुबळी५५१२५४४२*१०९५४
मुनवळ्ळी (सौदत्ती)८०४२७९३८*१५९८०
कल्लोळी (मुडलगी)६२१६६१७७*१२३९३
अरभावी (मुडलगी)५९३५६०७८*१२०१३
नागनुरी (मुडलगी)५६३०५५३७*१११६७
बोरगाव (निपाणी)६६१२६२६१*१२८७३
एक्संबा (चिक्कोडी)६७९१६८२२*१३६१३
अथणी१९३३०१९३३३*३८६६४ (इतर १)
शेडबाळ (कागवाड)५९४६५८७२*११८१८
ऐनापूर (कागवाड)७११२६९०९*१४०२१
उगार खुर्द (कागवाड)९३६४९२८८*१८६५२
हारुगेरी (रायबाग)१२२५९११९३८*२४१९७
मुगळखोड (रायबाग)९०६३८५७१*१७६३४
चिंचली (रायबाग)७८९४७६१०*१५५०४
कंकणवाडी (रायबाग)६१२९५९९४*१२१२३
एकूण१२८७७५१२६८३५*२५५६११
३०१ रिक्त जागांसाठी मतदान
स्थानिक स्वराज्य संस्थेतील रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात येत असून, त्यात कित्तूर स्थानिक स्वराज्य संस्थेतील २७ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासोबत एम. के. हुबळी १४, मुनवळ्ळी (सौदत्ती) २३, कल्लोळी (मुडलगी) १६,
अरभावी (मुडलगी) १६, नागनुरी (मुडलगी) १७, बोरगाव (निपाणी) १७, एक्संबा (चिक्कोडी) १७, अथणी २७,
शेडबाळ (कागवाड) १६, ऐनापूर (कागवाड) १९, उगार खुर्द (कागवाड) २३, हारुगेरी (रायबाग) २३, मुगळखोड (रायबाग)
२३, चिंचली (रायबाग) १९, कंकणवाडी (रायबाग) १७ जागांसाठी मतदान होणार आहे.
एक नजर
एकूण प्रभांग*३०५
बिनविरोधनिवड * ४
निवडणूक प्रभांग*३०१
रिंगणातील उमेदवार *९०२
मतदान तारीख ः २७ डिसेंबर
वेळ ः सकाळी ७ ते सायं ५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.