बेळगाव : यंदाचा पावसाळा अखेरच्या टप्यात आला आहे. यंदा प्रत्येक महिन्यात पावसाने सरासरी गाठली आहे. यंदा सप्टेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे सप्टेंबरची सरासरी पहिल्या दहा दिवसात पूर्ण झाली आहे. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात सरासरी ११२ मिमी पाऊस पडतो. मात्र, गेल्या वीस दिवसात १८३.४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा ७०.६२ मिमी पाऊस अधिक झाला आहे. गेल्या २० दिवसात खानापूरमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी चिक्कोडीत पाऊस झाला.
यंदा ऐन गणेशोत्सवात दमदार पाऊस झाला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. विसर्जनानंतरही पावसाची संततधार कायम होती. मात्र, सप्टेंबर २० तारीख उजाडली असून पाऊस अंतीम टप्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये अथणीत १२६.२ मिमी, बैलहोंगल २०८.६ मिमी, बेळगाव १९०.६ मिमी, चिक्कोडी १२०.९ मिमी, गोकाक १९२.८ मिमी, हुक्केरी १८०.६ मिमी, कागवाड १२९.२ मिमी, खानापूर ३१०.९ मिमी, कित्तूर १६७ मिमी, मुडलगी १३८.९ मिमी, निपाणी १९३ मिमी, रायबाग १५१.६ मिमी, रामदुर्ग २३३ तर सौंदत्तीत २२५.० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वीस दिवसात सर्वाधिक पाऊस २ रोजी झाला आहे. १ सप्टेंबरला २८.५८ मिमी, २ रोजी ३४.३४ मिमी, ३ रोजी ०.९ मिमी, ४ रोजी ०.५ रोजी ६.१४, ६ रोजी ३१.८३ मिमी, ७ रोजी १०.८४ मिमी, ८ रोजी २.८९ मिमी, ९ रोजी ३.१९ मिमी, १० रोजी ५.८१ मिमी, ११ रोजी २०.०२ मिमी, १२ रोजी २०.९७ मिमी,१३ रोजी १२.७१ मिमी, १४ रोजी १.०६ मिमी, १५ रोजी ०.८९ मिमी, १६ रोजी ०.७७ मिमी, १७ रोजी १.१५ मिमी, १८रोजी १.०८ मिमी, १९ रोजी ०.२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच यंदा मार्चमध्ये ८.३ मिमी, एप्रिल ७४.८१ मिमी, मे १०९.४५ मिमी, जून ९१.३४ मिमी, जुलै २१६.४१ मिमी तर ऑगस्टमध्ये १६२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.