Belgaum News : ‘कॅन्टोन्मेंट’च्या वेबसाईटवर चुकीची माहिती

अद्याप अपडेट नाही ; जुनीच माहिती प्रकाशित, लक्ष देणे गरजेचे
belgaum cantonment board website publish old information defence ministry
belgaum cantonment board website publish old information defence ministrySakal
Updated on

Belgaum News: कॅन्टोन्मेंट बोर्डाची वेबसाईट नियमित अपडेट केली जात नाही. त्यामुळे हद्दीतील नागरिकांना या माध्यमातून जुनीच माहिती उपलब्ध होते. बोर्डाचे सीईओ के. आनंद यांच्या आत्महत्येनंतर पंधरा दिवस उलटले तरी वेबसाईट अपडेट केली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

यामुळे नागरिकांपर्यंत या माध्यमातून चुकीची माहिती जात आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर सीईओ म्हणून के. आनंद व अध्यक्ष म्हणून रोहित चौधरी यांची नावे अजूनही आहेत. बोर्डाने नियमित माहिती अपडेट करावी, अशी मागणी होत आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड संरक्षण मंत्रालयांतर्गत चालते. सध्या बोर्डाचे अध्यक्ष जॉयदीप मुखर्जी आहेत. बोर्डाकडून नियमित माहिती अपडेट होणे आवश्‍यक आहे. तरीही ती अपडेट केली जात नाही. बोर्डाची वेबसाईट इंग्रजी, कन्नड व हिंदी या तीन भाषांमध्ये आहे.

तिन्ही भाषांमध्ये चुकीची माहिती आहे. यामध्ये बोर्डाच्या अध्यक्षांनीच लक्ष घालणे आवश्‍यक आहे. पंधरा दिवसांपूर्वी सीईओ आनंद यांनी आत्महत्या केली. सध्या बोर्डाचा कार्यभार प्रभारी सीईओंवरच आहे.

तरीही बोर्डाचे सीईओ म्हणून आनंद यांच्या नावाचाच उल्लेख आहे. बोर्डाचे अध्यक्ष मुखर्जी आहेत. मात्र, हिंदी व कन्नड भाषांमधील माहितीत बोर्डाचे अध्यक्ष म्हणून रोहित चौधरी यांच्या नावाचा उल्लेख आहे. यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

belgaum cantonment board website publish old information defence ministry
Belgaum News : बेळगाव जिल्ह्यात १७० बनावट डॉक्टर; आराेग्य विभागाला जाग, यादी जाहीर

बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

केंद्र सरकारकडून ऑनलाईन व्यवहार व पेपरलेस कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बोर्डातील सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.

मात्र, वेबसाईट अपडेट करण्याकडे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. बहुतांशी नागरिकांकडून बोर्डाच्या वेबसाईटचा वापर होतो. मात्र, चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच यामध्ये लक्ष घातल्यानंतर वेबसाईटमध्ये बदल होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.