बेळगाव : विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यानी वाढवा

सिद्धरामय्या; अध्यक्ष कागेरी यांना दिले पत्र
Belgaum Legislative Assembly Duration one Increase weekly
Belgaum Legislative Assembly Duration one Increase weeklysakal
Updated on

बेळगाव : विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यानी वाढविला जावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी आज (ता.21) विधानसभेत केली. बेळगाव आणि या भागातील विविध विषयांवर चर्चा बाकी असून, विषय विस्तृत स्वरूपात चर्चा करण्याची गरज असल्याचे जाणवते. यामुळे 1 आठवडा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे योग्य होईल, असा अभिप्राय सिद्धरामय्या यांनी नोंदविला.

Belgaum Legislative Assembly Duration one Increase weekly
विमाननगर रोड भागात भटक्या कुत्र्यांची दहशत

त्यावर सभापती विश्वेश्वरय्या हेगडे-कागेरी यांनी याबाबचे पत्र मला मिळाले आहे. यावर निर्णय व्हायचा आहे. मुख्यमंत्री आणि सरकारसोबत चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर उत्तर देण्यात येईल, अशी माहिती दिली.

अधिवेशन शुक्रवारपर्यंत चालणार असून यापैकी दोन दिवस उत्तर कर्नाटक भागातील प्रश्न मांडण्यासाठी दिले जातील, असे विधानसभा अध्यक्ष कागेरी यांनी दिली. त्याला कायदा व संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी आक्षेप घेतला. उ. कर्नाटक भागाच्या चर्चेसाठी 2 दिवस देऊ नका, अशी मागणी कायदा व संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधूस्वामी यांनी केली. अजून अनेक विधेयक व अन्य विषय आहेत. त्यावर चर्चा बाकी असल्याचे सांगितले. यावर सिद्धरामय्या यांनी चर्चेसाठी वेळ देऊ नये का, विधेयक आणण्यासाठी इतकी घाई का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच वेळ वाढविण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. 1 आठवडा अधिवेशनाचा कालावधी वाढवा, अशी मागणी केली. पण, त्याला मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्र्यांनी उत्तर दिले नाही. यामुळे विषय प्रलंबित आहे.

Belgaum Legislative Assembly Duration one Increase weekly
पुणे : शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतरांपेक्षा सरस; आढळराव

13 ते 24 डिसेंबर अधिवेशन

बेळगावात 13 ते 24 डिसेंबर या कालावधीसाठी विधिमंडळ अधिवेशन घोषित झाले आहे. सूप वाजण्यासाठी जेमतेम 3 दिवस शिल्लक असताना आणखी 1 आठवडा म्हणजे 30 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचा कालावधी वाढविला जावा, अशी मागणी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.