चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यात विधान परिषदेच्या २ जागांसाठी शुक्रवारी (१०) चुरशीने मतदान झाले. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्यावर आपलाच उमेदवार निवडून येणार, याबाबत अनेक राजकीय जाणकारांनी आकडेमोडीला सुरुवात केली होती. (Political News) मंगळवारी सकाळी (१४) चिक्कोडीतील आर. डी. महाविद्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. एकूण 32 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. (Belgaum news) निकालाबाबत उत्सुकता ताणली असून उमेदवार नेतेमंडळींची धाकधूक वाढली आहे. (belgaum legislative council election results 2021)
निवडणुकीत मतांसाठी प्रथमच मोठ्या प्रमाणावर झालेला लक्ष्मीचा खेळ पाहता अखेरच्या क्षणापर्यंत कोणते २ उमेदवार विजयी होणार, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. एकूण ६ उमेदवारांपैकी या निवडणुकीत भाजपचे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी व अपक्ष लखन जारकीहोळी यांच्यातच थेट लढत झाली. अखेरच्या टप्प्यात मतदारांना वळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. शिवाय काही ठिकाणी केवळ एकच मत तर काही ठिकाणी दुसर्या क्रमांकाची मते मिळविण्याचा प्रयत्न झाला. आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नेते, कार्यकर्ते व समर्थकांनी कंबर कसली होती. त्यात बाजी कोण मारणार, याचा फैसला आज निवडणूक निकालातून लागणार आहे. त्यावर जिल्ह्यातील या पुढील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता दिसत आहे. परिणामी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागून राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.