बेळगाव : बेळगाव शहरात गेल्या चार वर्षांपासून पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच ऑनलाइनच्या माध्यमातून अर्ज भरण्यासाठी १,५०० रुपये शुल्क आकारले जात आहे. मात्र, अर्ज भरणा व ऑनलाइनच्या माध्यमातून रक्कम अादा करण्यासाठी शहरातील काही सायबरचालकांकडून २ हजार रुपये आकारले जात असून, फक्त अर्ज भरणा करण्यासाठी ५०० रुपये घेतले जात आहेत. यातून सर्वसामान्यांची लूट सुरू असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बेळगाव शहरात अनेक सायबर कॅफे आहेत. या कॅफेच्या माध्यमातून अनेक जण पासपोर्टसह अन्य विविध परीक्षांसाठी अर्ज करतात. सायबरचालकांकडूनही एक अर्ज भरणा करण्यासाठी ५० रुपयांपासून जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंतची आकारणी केली जाते.
मात्र, पासपोर्टसाठीचा अर्ज भरण्याकरिता काही जण ५०० रुपये आकारत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. बेळगाव शहरात मुख्य टपाल कार्यालयाच्या आवारात २०१८ साली पोसपोर्ट सेवा केंद्राला सुरुवात झाली. आतापर्यंत हजारो जणांनी पासपोर्ट काढून घेतले आहेत. अनेक वर्षांच्या मागणीनंतर या ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याचा लाभ अनेक जण घेत आहेत. मात्र, अशाप्रकारे आता लूट सुरू आहे.
ऑनलाइनच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पासपोर्ट सेवा केंद्रात हजर राहावे लागते. यासाठी सुरुवातीपासूनच १,५०० रुपये शुल्क आहे. हे शुल्क ऑनलाइनच्या माध्यमातून भरावे लागते. मात्र, शहरातील काही सायबर कॅफेचालक एकत्रित २ हजार रुपये घेत आहेत. त्यामुळे एक अर्ज भरण्यासाठी ५०० रुपये कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहेत, तर काहींकडून १०० किंवा २०० रुपये आकारून अर्ज भरणा करत आहेत. त्यामुळे जादा पैसे आकारणाऱ्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
बेळगावात चार वर्षांपासून पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले आहे. रोज ८० जणांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. ऑनलाइन अर्ज भरणा करण्यासाठी १५०० रुपये शुल्क आहे.
- विजय नरसिंहा, पोस्ट अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.