बेळगाव शहरातून सद्य:स्थितीत देशातील ११ शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.
बेळगाव : बेळगाव-पुणे विमानसेवेला (Belgaum-Pune Flight Services) मागणी असूनही ही विमानसेवा अनेक महिन्यांपासून बंदच आहे. बेळगावातून विमानाने पुणे प्रवास करणाऱ्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही विमानसेवा लटकली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली कराव्यात, अशी मागणी होत आहे.
बेळगावातून सध्या स्टार एअर (Star Air) व इंडिगोच्या विमानसेवा (Indigo Airlines) आहेत. यापूर्वी अलाईन्स एअरलाईन्सची बेळगाव-पुणे ही विमानसेवा होती. मात्र, या कंपनीने येथील सर्वच विमानसेवा स्थगित केल्यानंतर येथील विमानसेवा बंद झाली आहे. पुणे विमानतळावरून परवानगी व वेळापत्रकाचे नियोजन करताना अडचणी येत असल्यामुळे ही विमानसेवा बंद आहे.
सप्टेंबरमध्ये बेळगाव-दिल्ली विमानसेवेची (Belgaum-Delhi Flight) घोषणा झाली. त्याचवेळी बेळगाव-पुण्याचीही घोषणा झाली होती. पुण्याची विमानसेवाही ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान सुरू केली जाणार होती. मात्र, तीन ते चार महिन्यांनंतरही ही विमानसेवा सुरू झालेली नाही. सद्य:स्थितीत महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा जोडली तरी बऱ्याचशा ठिकाणी विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे.
बेळगाव-पुणे दरम्यान प्रवास करण्याची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे बेळगाव-पुणे ही विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव शहरातून सद्य:स्थितीत देशातील ११ शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. अहमदाबाद, इंदूर, जोधपूर, मुंबई, तिरुपती, सुरत, बंगळूर, हैद्राबाद, नागपूर, जयपूर व दिल्ली या ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत. इंडिगो व स्टार एअर कंपन्यांमार्फत विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत.
बेळगाव-पुणे विमानसेवा सुरू करण्याला प्राधान्य दिले आहे. बेळगाव विमानतळावरून कोणतीही अडचण नाही. मात्र, पुणे विमानतळावरून परवानगी मिळत नसल्याने विमानसेवा बंद आहे. मार्चनंतर ही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
-एस. त्यागराजन, संचालक, सांबरा विमानतळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.