बेळगाव : बेळगाव शहरात ईएसआय रुग्णायलाशी सलग्नित असलेल्या फक्त सहा खासगी रुग्णालयात उपचार घेता येतात. ज्यामध्ये ईएसआय अंतर्गत येणारे कर्मचारी उपचार घेऊ शकतात. बेळगाव शहर व आसपासच्या रुग्णांचा विचार करता ईएसआय कार्पोरेशनने बेळगाव शहरातील आणखी खासगी रुग्णालयांत उपचार उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी कामगारांतून केली जात आहे.
बेळगाव शहरात सध्या अशोकनगर येथे मुख्य ईएसआय रुग्णालय आहे. याच्या अंतर्गत चन्नमा सर्कल, शहापूर, यमनापूर (इंडाल), उद्ममबाग व पिरनवाडी येथे डिस्पेंन्सरी आहेत. तसेच नेहरूनगर केएलई, येळ्ळूर रोड केएलई, विजय ऑर्थो, श्री ऑर्थो, कॉलेज रोड हॉस्पीटल व बेळगाव चिल्ड्रन हॉस्पिटलचा समावेश आहे. सध्या या ठिकाणी रुग्ण (कर्मचारी) उपाचार घेऊ शकतात. बेळगाव शहरात एकूण आठ औद्योगिक वसाहती आहेत. तसेच इतर खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. ईएसआय हॉस्पीटलमध्ये उपचार झाले नसल्यास त्यांच्यावर शहरातील सलग्नित असलेल्या रुग्णालयात उपचार केले जातात.
खासगी कंपनीत असलेले कर्मचारी ईएसआय कार्पोरेशनकडे प्रति महिना काही रक्कम अदा करतात. यामुळे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार मोफत मिळतात. बेळगाव शहरात नामांकित असलेली अनेक रुग्णालये आहेत. ज्यांच्यामध्ये देखील हे उपचार उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी कामगारांनी केली आहे. शहरात सहा पेक्षा अधिक रुग्णालयात ईएसआयकडून मोफत उपचार सुरु झाल्यास अनेक कामगारांना याचा लाभ होणार आहे. यासाठी संबंधीत रुग्णालयांनी देखील पुढाकार घेऊन आपल्या रुग्णालयात हे उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करावेत अशी मगणीही कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
'शहरात सध्या सहा खासगी रुग्णालयात ईएसआयकडून रुग्णावर मोफत उपचार केले जातात. दरवर्षी बैठक होऊन रुग्णालयांच्या वाढीसंबंधी चर्चा होते. लवकरच ही बैठक होणार आहे. संबंधीत रुग्णालयांकडूनही मागणी होणे आवश्यक आहे.'
-प्रकाश फोंडे, अधिक्षक, ईएसआय रुग्णालय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.