बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डिसीसी) मुरगोड शाखेत झालेल्या चोरीचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. त्यामुळे आजपासून अधिकाऱ्यांनी तपासचक्रे गतीमान केली आहेत.
चोरट्यांनी बनावट चाविचा उपयोग करून सुमारे ६ कोटी १ लाख ३७ हजार २२० रुपयांची रोकड व सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यानी स्ट्रॉंग रूममधील ३ किलो १४८.५०४ वजनाचे १ कोटी ६३ लाख ७२ हजार २२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ४ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपयांची रोकड आणि ६ हजार रुपये किमतीचा डिव्हीआर पळविल्याचे रविवार (ता.६) सकाळी ही घटना उघडकीस आले. प्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. काल सकाळी शिपाई बँकेकडे आला असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने ही माहिती बँक व्यवस्थापनाला दिली.
घटनेची माहिती समजताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एकही कुलूप न तोडता चोरट्यानी सर्व कुलूप चावीच्या आधारेच उघडले असल्याचे निदर्शनास आले. पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा, पोलिसप्रमुख महानिंग नंदगावी, पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. घडलेल्या या घटनेमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. सध्या पोलिसांना धागेदोरे सापडले नसले तरी लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रामदुर्गचे पोलीस अधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रामदुर्गचे पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नडवीनमणी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
रामदुर्ग येथील डिसीसी बॅंकेत झालेल्या चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी तपास गतिमान करण्यात आला आहे. उद्या मी पुन्हा रामदुर्गला भेट देऊन माहिती घेणार आहे.
-महानिंग नंदगावी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.