‘जारकीहोळी विरूध्द हेब्बाळकर’? ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

बेळगावत विधान परिषद निवडणुकीचा ज्वर वाढला
Laxmi Hebbalkar, Bhalchandr Jarkiholi
Laxmi Hebbalkar, Bhalchandr JarkiholiEsakal
Updated on

बेळगाव : जिल्ह्यातील दोन जागासाठी होत असणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्‍या (Legislative Council elections) प्रचाराचा ज्वर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर ही निवडणूक ‘जारकीहोळी विरूध्द हेब्बाळकर’ (Laxmi Hebbalkar, Bhalchandr Jarkiholi) असे समीकरण बनले आहे. जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अशीच चर्चा सुरू आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री आणि अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी विधान परिषद निवडणूक जारकीहोळी विरुध्द हेब्बाळकर नसून भाजप विरुध्द कॉंग्रेस अशी असल्याचे म्हटले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रविवारी (ता. २८) बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्राधान्य मत भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना तर दुसरे मत कॉंग्रेसच्या पराभवासाठी देण्याचे आवाहन केले आहे. याव्दारे निवडणुकीतील लखन जारकीहोळी यांच्या विषयीचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे.

लखन यांच्या उमेदवारीमुळे भाजप उमेदवारांच्या मतांची विभागणी होणार का? या प्रश्र्नावर त्यांनी प्रतिक्रिया देताना भालचंद्र जारकीहोळी यांनी याठिकाणी कोणीही निर्णायक नाही. आपण भाजप उमेदवाराचा प्रचार करत असून अन्य उमेदवारांचा विचार करत नसल्‍याचे सांगितले. बेळगाव जिल्ह्यातून कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन दोघा उमेदवारांना निवडून आणण्याचे काम करावे लागणार आहे. भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या विजयासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील, ते सर्व करत असल्याचे त्यांनी सांगितले.

रमेश जारकीहोळी यांनी कधीही लखन यांना भाजपने उमेदवारी द्यावी, असे म्हटले नाही. माझ्यासह राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, खासदार मंगल अंगडी, माजी आमदार संजय पाटील आदींनी ही मागणी केली आहे. लखन जारकीहोळी यांना पक्षाने दुसरा उमेदवार म्हणून उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली होती. मात्र वरिष्ठांनी केवळ एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. लखन यांना उमेदवारी मागे घ्यावी, असा दबाव कोणीही घालत नसल्याचेही भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले.

Laxmi Hebbalkar, Bhalchandr Jarkiholi
उमेदवारांची सोय : चारही नगरपंचायतींसाठी निवडणूक अधिकारी नियुक्त

मंत्री उमेश कत्ती, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, रमेश जारकीहोळी यांच्यासह आपण पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत आहोत. यामुळे ही निवडणुक ‘जारकीहोळी विरुध्द हेब्बाळकर’ अशी नसून ‘भाजप विरूध्द कॉंग्रेस’ असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.