दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी 'या' उद्योजकाची निवड; रावसाहेब पाटील यांच्या निधनानंतर महत्त्वाचा निर्णय

South India Jain Sabha : दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब आ. पाटील (Raosaheb Patil) यांचे अलीकडेच निधन झाले.
South India Jain Sabha
South India Jain Sabha esakal
Updated on
Summary

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कर्तबगार व्यक्तिमत्त्व व संघटक म्हणून भालचंद्र पाटील यांची ओळख आहे.

सांगली : दक्षिण भारत जैन सभेच्या (South India Jain Sabha) अध्यक्षपदी उद्योगजक भालचंद्र वीरेंद्र पाटील (Bhalchandra Patil) यांची निवड झाली आहे. दक्षिण भारत जैन सभेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाची बैठक सांगलीत सभेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. यामध्ये भालचंद्र पाटील यांची निवड चेअरमन रावसाहेब जि. पाटील यांनी सर्वानुमते जाहीर केली.

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब आ. पाटील (Raosaheb Patil) यांचे अलीकडेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर अध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. सभेच्या मुख्यालयातील बी. बी. पाटील सभागृहामध्ये मध्यवर्ती कार्यकारी मंडळाची बैठक झाली. यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी उद्योजक भालचंद्र वीरेंद्र पाटील यांची निवड झाल्याचे चेअरमन रावसाहेब जि. पाटील यांनी जाहीर केले.

South India Jain Sabha
'फडणवीस घाम पुसायला 3-4 रुमाल खिशात ठेवताहेत, आता निवडणुकीत त्यांना पाणी पाजणार'; जरांगे पाटलांचा थेट इशारा

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कर्तबगार व्यक्तिमत्त्व व संघटक म्हणून भालचंद्र पाटील यांची ओळख आहे. निवडीनंतर दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने भालचंद्र पाटील यांचा सन्मान करण्यात आला. भालचंद्र पाटील म्हणाले, दिवंगत अध्यक्ष रावसाहेब आ. पाटील यांनी घालून दिलेला आदर्श, सभा आणि समाजाची जपलेली आणि वाढविलेली प्रतिष्ठा यासाठी सदैव कार्यरत राहणार आहे.

समाजातील सामान्य माणूस, विद्यार्थी हा केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करायची आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा उद्धार करणे हे दक्षिण भारत जनसभेचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. धार्मिक सुधारणांसह आर्थिक आणि भौतिक उद्धार यासाठी आम्ही काम करू.

-भालचंद्र पाटील, अध्यक्ष, दक्षिण भारत जैन सभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.