Bharat Band - मोदी सरकारचा धिक्कार!

Bharat Band - मोदी सरकारचा धिक्कार!
Updated on
Summary

गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुध्द शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

बेळगाव : विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला बेळगावमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला असून सोमवारी सकाळी चेन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या साठहून अधिक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुध्द शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासह त्यांच्या इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी सोमवारी देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. याला पाठिंबा देत बेळगाव शहर आणि परिसरातील शेतकरी संघटनांबरोबर इतर संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी सकाळी राणी चन्नमा सर्कल येथे मोठ्या संख्येने जमले होते. मात्र संघटनांनी आवाहन केल्याप्रमाणे तालुका आणि इतर भागातून शेतकरी मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सर्वांना ताब्यात घेतले.

Bharat Band - मोदी सरकारचा धिक्कार!
वाघजाळी येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू

यावेळी शेतकऱ्यांनी अन्यायकारक कृषी कायदा रद्द झालाच पाहिजे केंद्र सरकारचा धिक्कार असो आदी प्रकारच्या घोषणा दिल्या. अटक केलेल्या पदाधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना एपीएमसी पोलिस स्थानकांत ठेवण्यात आले असून संतप्त शेतकऱ्यांनी टायर पेटवून यावेळी केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच काहीजणांनी मध्यवर्ती बस स्थानकासमोर जमुन बस अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी आंदोलन यशस्वी होणे यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रशासनाकडून ठिकठिकाणी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे दिसून आले.

शेतकरी संघटनेच्या नेत्यांना अटक करण्यात आली तरी मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी मोर्चा कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकरी विरोधी असणारे कृषी कायदे मागे घ्यावे अशी मागणी केली. संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या देशव्यापी बंदला विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने जनजीवन विस्कळीत होईल असे मत व्यक्त केले जात होते, मात्र परिवहन मंडळाच्या बससह इतर सुविधा राहिल्याने बंदचा कोणताही परिणाम बाजारपेठेवर दिसून आला नाही. तसेच बंदच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

Bharat Band - मोदी सरकारचा धिक्कार!
"राकेश टिकैत तालिबान्यांच्या पावलावर पाऊल टाकताहेत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.