पालकमंत्र्यांनी मांडलं परखड मत अन् मराठी नगरसेवकांना मिळाला मोठा दिलासा; असं काय म्हणाले जारकीहोळी?

बेळगाव भाग आधी मुंबई (Mumbai) प्रांतात होता, त्यामुळे येथे मराठीचा प्रभाव होता. त्यामुळे नगरसेवक मराठी भाषेत बोलतात.
Belgaum Municipal Corporation Satish Jarkiholi
Belgaum Municipal Corporation Satish Jarkiholiesakal
Updated on
Summary

कन्नड भाषेत बोलावे की नाही हा नगरसेवकांचा (Marathi Corporator) व्यक्तिगत प्रश्न आहे. नागरसेवकांनी कन्नड भाषेत बोलण्याचा निर्णय स्वतःहून घ्यायला हवा. त्यांच्यावर जबरदस्ती करता येणार नाही.

बेळगाव : बेळगाव महापालिकेत (Belgaum Municipal Corporation) महापौर, उपमहापौर किंवा नगरसेवकांना कन्नड भाषेत (Kannada language) बोलण्याची सक्ती करणे योग्य नसल्याचे परखड मत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी व्यक्त केले आहे.

बेळगाव भाग आधी मुंबई (Mumbai) प्रांतात होता, त्यामुळे येथे मराठीचा प्रभाव होता. त्यामुळे नगरसेवक मराठी भाषेत बोलतात. शिवाय लोकशाहीत कोणीही कोणत्याही भाषेत बोलू शकतो, असेही पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले. कन्नड भाषेत बोलावे की नाही हा नगरसेवकांचा (Marathi Corporator) व्यक्तिगत प्रश्न आहे. नागरसेवकांनी कन्नड भाषेत बोलण्याचा निर्णय स्वतःहून घ्यायला हवा. त्यांच्यावर जबरदस्ती करता येणार नाही, असेही ते म्हणाले.

Belgaum Municipal Corporation Satish Jarkiholi
'यशाला शॉर्टकट नाहीच'! MPSC मध्ये प्रथम आलेल्या विनायक पाटलांनी स्पर्धा परीक्षार्थींना दिला 'हा' मोलाचा सल्ला

महापालिकेचे प्रशासकीय कामकाज कन्नड भाषेतच चालते, केवळ बैठकीत नगरसेवक मराठी किंवा अन्य भाषेत बोलतात, त्यांनी कन्नड भाषेत बोलावे, यासाठीचे प्रयत्न सामंजस्याने व्हायला हवेत, अशी टिप्पणीही जारकीहोळी यांनी केली. जारकीहोळी यांनी शनिवारी बेळगावात पत्रकार परिषद घेतली.

त्यावेळी कन्नड प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या बैठकीत मराठी भाषेच्या होत असलेल्या वापराबाबत प्रश्न विचारला. महापालिकेची, राज्याची प्रशासकीय भाषा कन्नड असताना महापालिकेच्या बैठकीत महापौर, उपमहापौर, नगरसेवक मराठी भाषेत बोलतात, अशी तक्रार त्यांनी केली.

Belgaum Municipal Corporation Satish Jarkiholi
सावधान.. तुम्ही युरिया, डिटर्जंट पावडर पित आहात! दूध, दुग्धजन्य पदार्थांत मोठी भेसळ; कर्करोग, हृदयरोगाचा वाढला धोका

पण जारकीहोळी यांनी या विषयावर सडेतोड व परखड मत व्यक्त केले. २९ डिसेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत सत्ताधारी व विरोधी गटाच्या बहुतेक नागरसेवकांनी आपले प्रश्न मराठी भाषेत मांडले. त्याविरोधात कन्नड माध्यमांनी वार्तांकन केले होते. शिवाय कन्नड संघटनांनी त्याविरोधात आंदोलन केले होते. मराठीत बोलल्याबद्दल राज्यशासन नोटीस बजावणार असल्याची वावडी उठविण्यात आली होती.

Belgaum Municipal Corporation Satish Jarkiholi
शरद पवारांनी न्यायालयात जाण्याचा इशारा देताच देसाईंचं स्पष्टीकरण; म्हणाले, ED कारवाई कोणाच्या सांगण्यावरून नव्‍हे तर..

मराठीत नगरसेवकांना दिलासा

मनपाच्या पुढील बैठकीत मराठी नगरसेवक मराठी भाषेत बोलणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण जारकीहोळी यांनी याप्रकरणी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठी नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.