शिवाजी महाराजांचेच कार्य पहिले चिंतामणराव आप्पासाहेब यांनी ते पुढे चालवले. परंपरेनुसार शिवाजी महाराजांच्या गादीला नेहमी नमन करतो.
सांगली : ‘‘अखंड महाराष्ट्राचे दैवत साताराची गादी आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे सेवक आहोत. पेशवे त्यांचे सेवक होते. त्यांनी आमची सरदार म्हणून नेमणूक केली, म्हणून आम्ही छत्रपतींच्या सेवकांचे सेवक आहोत,’’ असे प्रतिपादन गणपती पंचायतन संस्थानचे प्रमुख विजयसिंहराजे पटवर्धन (Vijaysinhraje Patwardhan) यांनी केले.
कलानगरमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक-अध्यक्ष नितीन चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांसह विजयसिंहराजे यांनी श्री गणरायाची आरती केली. उपस्थिती युवा सहकाऱ्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘हे हिंदवी स्वराज प्रस्थापित करण्यासाठी शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) झटले. हिंदुस्थान हे हिंदवी राज्यच आहे. हिंदवी लोकांनी इतर कोणाला त्रास दिला नाही, म्हणूनच इतर धर्म हिंदुस्थानमध्ये राहू शकले. पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगली वसवली. शिवाजी महाराजांचेच कार्य पहिले चिंतामणराव आप्पासाहेब यांनी ते पुढे चालवले. परंपरेनुसार शिवाजी महाराजांच्या गादीला नेहमी नमन करतो. महाराष्ट्राचे आराध्य राजघराणे म्हणजेच साताराची गादी आहे.’’
चौगुले म्हणाले, ‘‘पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगली वसविली. त्यांचेच वंशज आताचे विजयसिंहराजे हे सांगलीच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असतात.’’ पटवर्धन कुटुंबीयांना शाल पुष्पगुच्छ, श्रीफळ व दुर्गमातेची मूर्ती देऊन सम्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.