सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेऊन अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठींबा दिला आहे.
दरम्यान, जयवंतराव जगतापांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत, संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्याने, संजय शिंदे यांचं पारडं काहीसं जड झालं आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज नारायण पाटील यांनी सेनेचा राजीनामा देऊन, अपक्ष उमेदवारी दाखल केली. रश्मी बागल यांच्यापुढे आधीच नारायण पाटील यांचं आव्हान असताना, आता संजयमामा शिंदे यांना जयवंतराव जगतापांनी पाठिंबा दिल्याने, रश्मी बागल यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झालं आहे.
करमाळ्यात शिवसेनेकडून रश्मी बागल, राष्ट्रवादीकडून संजय पाटील घाटनेकर यांच्यात थेट लढत होत आहे. तर नारायण पाटील आणि संजय शिंदे हे दोन्ही तगडे उमेदवार अपक्ष रिंगणात आहेत. नारायण पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांना राजीनाम्याचा इशारा देत करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची करून माझी उमेदवारी कापली, असा आरोप शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी केला आहे.
शिवसेनेने नारायण पाटील यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत. उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष अर्ज भरला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.