Sangli : '35 वर्षे नुकसान केलं, त्यांना आता कासेगावला पाठवा'; भाजप नेत्याची जयंत पाटलांवर आष्ट्यात टीका

BJP leader Nishikant Bhosale-Patil : १७ वर्षांपूर्वीचे मटण मार्केट, तसेच अन्य प्रश्न सुटत असताना काळे झेंडे दाखवले जातात. हे अतिशय चुकीचे आहे.
BJP leader Nishikant Bhosale-Patil
BJP leader Nishikant Bhosale-Patilesakal
Updated on

आष्टा : ‘‘देशात लोकशाही आहे, कासेगाववाल्यांची हुकूमशाही नाही. विकास कामांच्या उद्‌घाटनासाठी प्रोटोकॉलची आवश्‍यकता नसते. प्रभागातील नागरिक सुद्धा विकास कामांचा प्रारंभ करू शकतात. ३५ वर्षे ‘त्यांनी’ तुमचं नुकसान केलं. यावेळी परिवर्तन करा. ते मतदारसंघातील नाहीत, त्यांना त्यांच्या मतदारसंघात कासेगावला (Kasegaon) पाठवा,’’ असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (Nishikant Bhosale-Patil) यांनी येथे विकास कामांच्या उद्‌घाटनावेळी आयोजित सभेत केले.

विकास कामांच्या उद्‌घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये (BJP) तणाव निर्माण झाला होता. भोसले-पाटील यांच्या हस्ते सोमलिंग तलाव सुशोभीकरण प्रारंभ, चर्मकार भवन भूमिपूजन, मटण मार्केट इमारत लोकार्पण झाले.

BJP leader Nishikant Bhosale-Patil
महाराष्ट्रातील साखर हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; अजितदादांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण माने म्हणाले, ‘‘आष्टा शहरात ५२ कोटींची कामे केलीत. नेते तुमच्याकडे, सामान्य जनता आमच्याकडे, अशी स्थिती आहे. मतदारसंघातील जनता इतिहास रचणार आहे. निशिकांत पाटील यांना आमदार करणार आहे. इथून पुढे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.’’ भोसले-पाटील म्हणाले, ‘‘३५ वर्षे नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे, तरी त्यांना नागरपालिकेचे साधे कायदे माहीत नाहीत. आष्ट्यात विकास कामांसाठी कितीही पैसे दिले, तरी ते वैयक्तिक लोकांच्या घरी जातात. ३५ वर्षे जयंत पाटील आमदार होते. आजपर्यंत निधी कमी मिळत होता.

BJP leader Nishikant Bhosale-Patil
Hasan Mushrif : समरजित घाटगेंवर टीका करताना हसन मुश्रीफांची जीभ घसरली; म्हणाले, कोणत्या प्रवृत्तीमुळं ED चं...

भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण माने म्हणाले, ‘‘आष्टा शहरात ५२ कोटींची कामे केलीत. नेते तुमच्याकडे, सामान्य जनता आमच्याकडे, अशी स्थिती आहे. मतदारसंघातील जनता इतिहास रचणार आहे. निशिकांत पाटील यांना आमदार करणार आहे. इथून पुढे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.’’ भोसले-पाटील म्हणाले, ‘‘३५ वर्षे नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे, तरी त्यांना नागरपालिकेचे साधे कायदे माहीत नाहीत. आष्ट्यात विकास कामांसाठी कितीही पैसे दिले, तरी ते वैयक्तिक लोकांच्या घरी जातात. ३५ वर्षे जयंत पाटील आमदार होते. आजपर्यंत निधी कमी मिळत होता.

BJP leader Nishikant Bhosale-Patil
BJP leader Nishikant Bhosale-Patilesakal

इस्लामपूरला प्रांत कार्यालयामध्ये लिफ्ट नाही. दिव्यांग व्यक्तींनी वर कसे जायचे? एवढे सुद्धा आमदारांना कळत नाही. हे स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहेत. उसाच्या दराबाबत कोण आडवे येते, ते बघा. धरणग्रस्त, अभयारण्यग्रस्तांचे प्रश का सुटत नाहीत? हे थांबवाचे असेल तर तुमच्या एका मतात फार ताकद आहे. तुमचे एक मत निष्क्रिय आमदाराला घरी बसवू शकते. आष्ट्यातील एका कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावला तर डोक्यावरती केस राहणार नाहीत.’’ दादासाहेब वाघमारे, अक्षय वाघमारे, दत्ता कोळेकर, उदय कवठेकर, विशाल आडके, सुरेश मोटकट्टे, भैया मंडले व नागरिक मोठ्या संख्येने भरपावसात उपस्थित होते. संदीप गायकवाड यांनी आभार मानले.

BJP leader Nishikant Bhosale-Patil
Shiv Sena Controversy : शिवसेना ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; इंगवलेंचा पवारांवर रोष, काॅल रेकॉर्डिंग व्हायरल

भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत तणाव

भाजपकडून होत असलेल्या विकास कामांच्या उद्‌घाटनासाठी आमदार जयंत पाटील यांना बोलावले नाही. कामाच्या कोनशिलेवर त्यांचे नाव नाही. यासाठी आष्ट्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे व नगरपालिकेत निवेदन देऊन, उद्‌घाटन कार्यक्रमासाठी भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील येत असताना, काळे झेंडे दाखवले. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधल्या होत्या. भरपावसात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

‘त्या वेळी आम्ही झेंडे दाखवले का?’

‘‘इस्लामपुरात तहसील कार्यालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन झाले. त्यावेळी मी नगराध्यक्ष असताना, कोनशिलेवर माझे नाव घातले नाही. यावेळी आम्ही काळे झेंडे दाखवायला गेलो नाही,’’ असे निशिकांत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.