Sindhudurg : आता तुम्ही पुन्हा कसं निवडून येता, हे आम्ही बघतोच; दरेकरांचं 'या' दोन आमदारांना थेट चॅलेंज

'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व देशातल्या लोकांनी मानलंय.'
BJP leader Pravin Darekar vs Bhaskar Jadhav
BJP leader Pravin Darekar vs Bhaskar Jadhavesakal
Updated on
Summary

'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व देशातल्या लोकांनी मानलंय.'

सिंधुदुर्ग : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) बंडखोरी केल्यामुळं सेनेत मोठी फूट पडलीय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट विरुध्द एकनाथ शिंदे गट असा सामना पहायला मिळत आहे. याच फुटीचा फायदा आता भाजप (BJP) घेताना दिसत आहे. भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचा चांगलाच समाचार घेतला.

भास्कर जाधवांसारखी (Bhaskar Jadhav) प्रवृत्ती वाढली तर कोकणचं दुदैव म्हणावं लागेल. आता तुमचे दिवस संपले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व देशातल्या लोकांनी मानलंय. ठोशाला ठोसा द्यायला राणेंना बरोबर माहित आहे. मात्र, संविधानाला मानायचं काम राणेंनी केलं असल्यामुळंच भास्कर जाधवांनी एवढं बोलूनही राणेंनी काही केलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. कुडाळ इथं आज भाजपच्या वतीनं संविधान रॅली (Constitution Rally) काढण्यात आली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भास्कर जाधवांना इशारा दिला.

BJP leader Pravin Darekar vs Bhaskar Jadhav
Jayant Patil : शिंदे गटात गेलेल्या आमदारांना पश्चाताप; NCP च्या प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणचा विकास होतोय. त्याला रोखण्याचं काम भास्कर जाधव, वैभव नाईक (Vaibhav Naik) करताहेत. वैभव नाईक यांना समर्थन देण्यासाठी चिपळूणवरून नाचे आले होते. काही दिवसांपूर्वी शरद पवारांचा झेंडा घेतला आणि आता हे कडवट शिवसैनिक झालेत, असा टोला दरेकरांनी जाधवांना दिला. तुम्ही पुन्हा कसं निवडून येता हे आता आम्ही बघतोच, असं आव्हानही दरेकरांनी यावेळी दिलं. कुडाळमधील भाजपच्या संविधान रॅलीत प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane), प्रमोद जठार यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.

BJP leader Pravin Darekar vs Bhaskar Jadhav
Taj Mahal : 'ताजमहाल'च्या 22 बंद खोल्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; म्हणाले, आधी संशोधन करा मगच..

संविधानाला कोणी आव्हान देणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे, असं दरेकरांनी स्पष्ट करत केंद्रीय तपास यंत्रणा ह्या संविधानाला व घटनेला अनुसरून संस्था आहेत. तुमची अँटी करप्शन (Anti-Corruption) विभागाकडून चौकशी सुरू झाली म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरून मोर्चा काढणार, संविधानानं दिलेल्या यंत्रणेला मानणार नाही, संविधानालाच मानणार नाही? हे कदापि सहन केलं जाणार नाही, असा इशाराही दरेकरांनी वैभव नाईक आणि महाविकास आघाडीला दिला. ही रॅली आमदार वैभव नाईकांच्या एसीबीच्या कारवाई संदर्भात पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()