''भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिले. उच्च न्यायालयात ते टिकवून देखील दाखवले.’’
शिराळा : ‘‘राज्याच्या हिताचे काम कसे करावे, हे शिवाजीराव देशमुख (Shivajirao Deshmukh) यांच्याकडून शिकलो. शिराळ्याला चांगला राजकीय वारसा आहे. येथे अनेक दिग्गज असल्याने महायुतीचे कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही,’’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केले. येथे रसिका हॉल येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.