इचलकरंजी नगरपालिकेत राजकीय भूकंप

bjp won in ichalkaranji municipal affairs committee  Election.gif
bjp won in ichalkaranji municipal affairs committee Election.gif
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) ः राज्यातील राजकीय गणिते बदलत असतानाच इचलकरंजी नगरपालिका विषय समितीच्या सभापती निवडीच्या निमित्ताने येथे राजकीय भूकंप झाला आहे. अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शाहू विकास आघाडीचे मदन कारंडे यांच्या नेतृत्वाखालील गटाने एकत्र येत सर्व विषय समित्यांवर आपले वर्चस्व ठेवण्यात यश मिळविले आहे. यापूर्वीच्या ताराराणी आघाडी आणि माजी आमदार अशोक जांभळे यांच्या गटाला बाजूला करत पालिकेत सत्तेचे नवीन समीकरण करण्यात आले आहे.

राज्यातील मोठी नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेत यापूर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर भाजपच्या उमेदवार अलका स्वामी या निवडून आल्या, मात्र भाजपला सभागृहात अपेक्षित संख्याबळ नसल्याने त्यांनी पालिकेतील विविध गटांना एकत्र करून विषय समित्यांवर वर्चस्व ठेवले होते. राज्यात सगळीकडेच सत्तेचे समीकरणे बदलत असताना या ठिकाणी मात्र स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन वेगळाच भूकंप घडवला आहे.

यापूर्वी सत्तेत असणाऱ्या ताराराणी आघाडीला व माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जांभळे यांना बाजूला करत सत्तेचे नवे समीकरण तयार केले. चार महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कट्टर विरोधक असलेले विद्यमान आमदार आवाडे व माजी आमदार हाळवणकर हे पालिकेच्या सत्ता समीकरणात एकत्र आले आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते कारंडे यांच्या नेतृत्वाखालील शाहू विकास आघाडी ही या सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकीय क्षेत्रात हा मोठा भूकंप मानला जातो
.
अशी झाली पद विभागणी

आवाडे प्रणित काँग्रेस : शिक्षण आणि बांधकाम 

कारंडे यांची शाहू विकास आघाडी : महिला आणि पाणीपुरवठा 

भाजप : उपनगराध्यक्ष व आरोग्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.