कर्नाटकचे पोलिस अधिकारी गोपाळकृष्ण गौडर व बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता.
कागल : एक नोव्हेंबर रोजी सीमाभागातील मराठी बांधवांकडून काळा दिन (Black Day Belgaum) पाळला जातो. यामध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे (Vijay Devane) बेळगावकडे जात होते. कोगनोळीजवळ त्यांना कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) अडवले व कर्नाटकात जाण्यास मज्जाव केला.