गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत काळा दिनाच्या फेरीला परवानगी देणार नाही, असे सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.
बेळगाव : कर्नाटक पोलिसांची (Karnataka Police) दडपशाही झुगारून हजारो मराठी भाषिक काळा दिनाच्या (Black Day Belgaum) फेरीत प्रचंड संख्येने सहभागी झाले आहेत, तसेच फेरीत युवकही मोठ्या प्रमाणात आल्यामुळे 68 वर्षानंतरही महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार कायम असल्याचे फेरीच्या माध्यमातून दिसून आले.