बेळगावात काळ्यादिनी कर्नाटक पोलिसांची दडपशाही

मराठा मंदिर परिसरात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून ठिकठीकाणी कार्यकर्त्यांची अडवणूक केली जात आहे.
black day
black dayesakal
Updated on
Summary

मराठा मंदिर परिसरात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून ठिकठीकाणी कार्यकर्त्यांची अडवणूक केली जात आहे.

बेळगाव : भाषावार प्रांतरचना करतेवेळी झालेल्या अन्यायाविरोधात सीमाभागात आज काळा दिन पाळण्यात येत असून अनेक भागात शुकशुकाट पहावयास मिळत आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेले धरणे आंदोलन कार्यक्रम होऊ नये यासाठी पोलिसांकडून दडपशाही सुरू झाली आहे. मराठा मंदिर परिसरात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून ठिकठीकाणी कार्यकर्त्यांची अडवणूक केली जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.

black day
''देवेंद्र फडणवीसांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध'', मलिकांचा खळबळजनक दावा

दरवर्षी काळ्‍या दिनी भव्य फेरी काढली. मात्र यावेळी ही फेरी कोरोनाचे कारण देत नाकारण्यात आली तरीही मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन करून निषेध नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु मराठा मंदिरकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या कार्यकर्त्यांची अडवणूक केली जात आहे. या कृतीचा मराठी भाषीकांतून तीव्र निषेध व्यक्त होत असून कोणत्याही परिस्थितीत धरणे आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते विविध मार्गाने मराठा मंदिर येथे दाखल होऊ लागले आहेत.

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या घरासमोर आज पहाटे साडेचार वाजल्यापासून पोलिस दाखल झाले होते. धरणे कार्यक्रमाला परवानगी नाही, त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडू नका म्हणून दादागिरी केली जात आहे. इतर कार्यकर्त्यांवरही दडपशाही केली जात आहे. शहरासह खानापूर, निपाणी आदी भागातही समितीतर्फे निषेध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आ. यात हजारो कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

black day
पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार; 'IMD'चा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.