सांगली - दसरा, दिवाळी आणि आता विधानसभा निवडणुकी एकापाठोपाठ आल्याने जिल्ह्यात रक्त पिशव्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन महिन्यांत एकही रक्तदान शिबिर न झाल्याने गरजवंत कुटुंबांवर रक्तदाते शोधण्याची वेळ आली आहे. ऐच्छिक रक्तदाते कमी झाल्याने ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.