Sangli Crime : दारु पिऊन आईला का शिव्या देतोस म्हणत सख्ख्या भावानेच केला लहान भावाचा खून

धारदार शस्त्राने दत्तात्रय याच्या डोक्यात वार केले.
Crime News
Crime NewsEsakal
Updated on
Summary

आई-वडिलांपासून स्वतंत्र राहूनही वाद सुरूच होते. दोघांत पुन्हा वादावादी झाली.

सांगली : दारू पिऊन सतत भांडण करून आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून मोठ्या भावाने लहान भावाचा काठीने मारहाण करून आणि धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना नांद्रे (ता. मिरज) येथील कुंभार गल्लीत बुधवारी रात्री घडली.

संशयितास पोलिसांनी अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस (Sangli Rural Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेवेळी दोघेही भाऊ दारूच्या नशेतच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Crime News
Konkan Ganeshotsav : भजनानंतर गावाकडं परतताना काळाचा घाला; दुचाकीवर झाड कोसळून सख्खे चुलत भाऊ ठार

दत्तात्रय प्रकाश कुंभार (वय ३०) असे मयताचे नाव आहे. संशयित आरोपीचे नाव राहुल ऊर्फ बसवेश्वर प्रकाश कुंभार (वय ३२) आहे. याप्रकरणी प्रकाश यल्लाप्पा कुंभार (रा. कुंभार गल्ली, नांद्रे) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दत्तात्रय आणि त्याचा भाऊ राहुल हे दोघेही मजुरी करतात. त्यांना दारूचे व्यसन आहे. घरात किरकोळ कारणावरून त्यांच्यात सतत भांडण होत. दोघेही दारू पिवून आई चंपाबाई यांना शिवीगाळ करीत असत. वडिलांशीही त्यांचा वाद होत होता. याला कंटाळून काही महिन्यांपासून त्यांचे आई-वडील घरातून बाहेर पडून कुंभार गल्लीतच अन्यत्र राहतात. दोघे भाऊ एकत्र राहतात.

Crime News
Ganpati Visarjan : अवघ्या 12 तासांत होत्याचं नव्हतं झालं! मिरवणुकीनंतर तरुणाचा मेंदूतील रक्तस्रावाने अचानक मृत्यू, असं काय घडलं?

आई-वडिलांपासून स्वतंत्र राहूनही वाद सुरूच होते. बुधवारी (ता. २७) रात्री साडे दहाच्या सुमारास दोघांत पुन्हा वादावादी झाली. त्यावेळी आरोपी राहुल याने भाऊ दत्तात्रय यास तू दारु पिवून आईस शिवीगाळ का करतोस? असा जाब विचारला. यातून दोघांमध्ये हाणामारी होऊन आरोपी राहुल याने घरातील काठीने दत्तात्रय यास मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने दत्तात्रय याच्या डोक्यात वार केले.

Crime News
Kolhapur Politics : 'महाडिक धुमधडाका अन् एकच साहेब बंटी साहेब’ घोषणेमुळं सभेत गोंधळ; विरोधकांकडून ठरावाची होळी

प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने दत्तात्रय याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, बुधगाव येथे गणेशोत्सवानिमित्त बंदोबस्तास असलेले पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील, तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच संशयितास ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.