सोलापूर ः महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर सोलापूर जिल्ह्यातील अनेकजणांच्या नावाची चर्चा मंत्रीपदासाठी सुरु झाली. पहिल्या विस्ताराचे संकेत मिळाले त्यावेळी तर विविध मंत्रीपदांची घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी वाटणीही केली. प्रत्यक्ष आज सोमवारी विस्तार जाहीर झाल्यावर मात्र सोलापूरच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता आल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा... शपथ घेतल्यावर अजीत पवारांना मुख्यमंत्री म्हणाले
पाचपैकी एकालाही नाही संधी
सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी पाच जागांवर महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे आमदार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी कॅंाग्रेसचे बबनराव शिंदे, भारत भालके, यशवंत माने, कॅंाग्रेसच्या प्रणिती शिंदे व शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा समावेश आहे. संजय शिंदे व राजेंद्र राऊत हे दोन अपक्ष आमदार आहेत. याशिवाय, विजय देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी व राम सातपुते हे भाजपचे चार आमदार आहेत.
हे आवर्जून वाचा.. माजी मुख्यमंत्री पुन्हा मंत्रीपदी
जिल्ह्यात लागल्या पैजा
महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर मंत्रीपदासाठी सर्वात आधी नाव आले ते सांगोल्यातील शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे. त्यानंतर भारत भालके की बबनदादा शिंदे अशी चर्चा सुरु झाली. ही चर्चा इतकी रंगली की, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बबनदादा शिंदे यांना मिळते की भारत भालके यांना इथंपर्यंत पैजा लागल्या.
आनंदी क्षण... भाऊ मंत्री होताना रितेशचा भरला अभिमानाने उर
प्रणिती शिंदे यांनाही नाही संधी
विस्ताराची तारीख निश्चित झाली तशी, कॅंाग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यांना कॅबिनेटमंत्रीपद मिळणार अशा पोस्टही सोशल मिडीयावरून फिरू लागल्या. अखेर रविवारी रात्री साडेदहा वाजता कॅांग्रेसच्या मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर झाली, त्यानंतर प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा रात्री अकरानंतर थांबली. दरम्यान, शिंदे यांचे नाव निश्चित असल्याची खात्री देत शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले होते, सोमवारी सकाळी त्यांचा भ्रमनिरास झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.