Atpadi Election : भाजप, राष्ट्रवादीला मोठा धक्का; शेवटच्या क्षणी शिवसेनेनं फिरवली बाजी

भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत ९ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे गुप्त झालेल्या मतदानात सेनेने बाजी मारली.
Atpadi Bazar Samiti Election
Atpadi Bazar Samiti Electionesakal
Updated on
Summary

सत्ताधारी आणि विरोधी गटाला समान ९ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदावर कोण विराजमान होणार? याची उत्सुकता लागली होती.

आटपाडी : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आटपाडी बाजार समितीच्या (Atpadi Bazar Samiti Election) सभापतिपदावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे संतोष पुजारी आणि उपसभापतिपदावर काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची १० विरुद्ध ८ मतांच्या फरकाने निवड झाली.

शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस आणि रासप आघाडीने ९, तर सत्ताधारी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत ९ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे गुप्त झालेल्या मतदानात सेनेने बाजी मारली. आटपाडी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे स्थापनेपासून निर्विवाद वर्चस्व राहिले होते.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी काँग्रेसचे जयदीप भोसले आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती, तर सत्ताधारी गटाने माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्याशी आघाडी करून निवडणूक लढवली होती. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना तगडे आव्हान दिले होते.

सत्ताधारी आणि विरोधी गटाला समान ९ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदावर कोण विराजमान होणार? याची उत्सुकता लागली होती. निवडणूक निकालानंतर सत्ताधारी गटाने त्याच रात्री निवडून आलेल्या संचालकांना अज्ञातस्थळी हलवले होते. सर्वांचे फोन बंद होते. तर विरोधी गटाने निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आपले नूतन सदस्य बाहेर ठेवले होते.

आज तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवड पार पडली. सत्ताधारी भाजप आघाडीने सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख आणि उपसभापतिपदासाठी दादासाहेब हुबाले यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले, तर शिवसेना आघाडीकडून सभापतिपदासाठी संतोष पुजारी आणि उपसभापतिपदासाठी राहुल गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Atpadi Bazar Samiti Election
Municipal Election : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार अलर्ट; राष्ट्रवादी 'बॅकफूट'वर

दोन्ही गटांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुप्त मतदान घेण्याची प्रक्रिया राबवली. भाजप आघाडीचे नऊ सदस्य एका बाजूला आणि शिवसेना आघाडीचे नऊ सदस्य दुसऱ्या बाजूला बसले होते. मतदान झाले तरीही कोणालाही कसलाही अंदाज लागला नव्हता. बाहेर लोकांची उत्सुकता ताणली होती.

Atpadi Bazar Samiti Election
Political News : उपमुख्यमंत्रिपदी दलित नेत्याची निवड करा, अन्यथा..; डीकेंची निवड होताच बड्या नेत्याचा थेट इशारा

प्रत्यक्षात मतमोजणी झाल्यानंतर सेनेच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या उमेदवारांना १० मते पडली, तर भाजप आघाडीच्या उमेदवारांना ८ मते पडली. निवडणूक निकाल जाहीर केल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. आटपाडी बाजारपेठेतून मिरवणूक काढली. आटपाडी बाजार समितीत सत्तांतर करून तानाजीराव पाटील यांनी पहिल्यांदाच ताब्यात घेतली. भाजप गटाचे राजेंद्रअण्णा देशमुख यांना हा जबर धक्का मानला जातो.

Atpadi Bazar Samiti Election
Belgaum Election : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित होताच 'या' आमदारांत मंत्रिपदासाठी लागली चुरस

शेवटपर्यंत एकमत नाही

भाजप आघाडीकडून सभापतिपदासाठी बरेच जण इच्छुक होते. यामध्ये नेतेमंडळींनी लक्ष घालून समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना यश आले नाही, ते मतमोजणीनंतर दिसून आले. तर शिवसेनेकडे ही सभापतिपदासाठी काहीजण इच्छुक होते. मात्र त्यांच्या एकमत झाल्याने त्यांनी बाजी मारली. गुप्त मतदान झाल्याने कोण फुटला, यावर वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.