Sangli : घोडीला गर्भधारणा होऊ नये म्हणून मालकांनी केलं अघोरी कृत्य; तांब्याच्या तारेने टाके बांधले अन् रक्तबंबाळ अवस्थेत घोडी..

भारती हॉस्पिटलसमोर रक्तबंबाळ अवस्थेत ही घोडी फिरत होती.
Animal Rahat sangli Vishrambag Police
Animal Rahat sangli Vishrambag Policeesakal
Updated on
Summary

सांगली शहरात रस्त्यावर सर्वत्र घोडे फिरताना दिसतात. त्यांचा शर्यतीत पळवण्यासाठी वापर होतो.

सांगली : भटकायला सोडलेल्या घोडीला गर्भधारणा होऊ नये, यासाठी घोडी मालकांनी अघोरी प्रकार केल्याचे सांगलीत उघडकीस आले आहे. अशा घोडींचा नाजूक अवयव तांब्याच्या तारेने टाके घालून बंद केला होता.

Animal Rahat sangli Vishrambag Police
Indian Army : वीर जवान तुझे सलाम, शहीद भोईटेंना अखेरचा निरोप; दीड वर्षाच्या चिमुरडीनं दिला भडाग्नी, कुटुंबीयांचा आक्रोश

‘ॲनिमल राहत’च्या टीमने या तारा सोडवल्या. शिवाय अनोळखी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित मालकांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. ‘ॲनिमल राहत’ ही संस्था (Animal Rahat, Sangli) गेली २० वर्षे सांगली जिल्ह्यात कार्यरत आहे. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास टीम शहरात फिरत होती.

त्यावेळी डॉ. अजय बाबर यांना अंदाजे दोन ते तीन वर्षांची तीन घोडी दिसली. त्यांचा नाजूक अवयव तांब्याच्या तारेने अनैसर्गिक पद्धतीने शिवल्याचे आढळून आले. भारती हॉस्पिटलसमोर रक्तबंबाळ अवस्थेत ही घोडी फिरत होती. हे खूप वेदनादायक आणि बेकायदेशीर असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘राहत’चे प्राणी कल्याण निरीक्षक कौस्तुभ पोळ यांनी विश्रामबाग पोलिसांना (Vishrambag Police) माहिती दिली.

Animal Rahat sangli Vishrambag Police
Kolhapur : ..तरच ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये होईल विवाहाची नोंद; 'या' पंचायतीचा महत्वपूर्ण ठराव

पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ‘राहत’चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश चित्तोरा, डॉ. विनायक सूर्यवंशी, डॉ. अजय बाबर, गोरखनाथ कुराडे यांनी या घोडींना भूल देऊन त्या तारा काढल्या. त्यानंतर त्यांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. दरम्यान, असे कृत्य गंभीर असून कायद्याचे उल्लंघन करणारे आणि अमानवीय असल्याने अनोळखी मालकांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला.

भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२८, प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११ या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली. याआधीही सांगलीत असे प्रकार घडले आहेत. संबंधित मालकांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी कौस्तुभ पोळ यांनी केली आहे.

Animal Rahat sangli Vishrambag Police
Satara News : 'या' स्मशानभूमीत कावळे नव्हे, तर वानरे शिवतात नैवेद्य; कारण ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

प्राणिमित्र म्हणतात...

सांगली शहरात रस्त्यावर सर्वत्र घोडे फिरताना दिसतात. त्यांचा शर्यतीत पळवण्यासाठी वापर होतो. शर्यत झाली की त्यांना रस्त्यावर चरण्यासाठी असे बेवारस सोडले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने घोडींचे प्रमाण अधिक आहे. त्यांची गर्भधारणा होऊ नये, याकरिता मालकांकडून अशा अनैसर्गिक पद्धतीचा उपयोग केला जातो. अशा घटना रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी ठोस कारवाई करण्याची अपेक्षा प्राणिमित्रांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.