Islampur : शिंदे सरकारविरोधात 'गद्दार' म्हणून घोषणाबाजी; राष्ट्रवादीच्या 17 पदाधिकाऱ्यांसह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमले होते आणि त्यांनी गद्दार दिवस साजरा केला होता.
NCP Islampur
NCP Islampuresakal
Updated on
Summary

जमावबंदी आदेश असताना एकत्र जमाव जमवून शिंदे सरकार गद्दार म्हणून घोषणा देत निदर्शन आंदोलन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इस्लामपूर : जमावबंदी आदेशाचा भंग करत येथील तहसील कार्यालय चौकात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रमुख १७ पदाधिकाऱ्यांसह ४० कार्यकर्त्यांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात (Islampur Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार अमर शिवाजी जंगम यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय बळवंत पाटील, शहराध्यक्ष शहाजी राजाराम पाटील, सरचिटणीस अरुण कांबळे, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजी शहाजी पाटील (तांबवे), नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकध्यक्ष संग्रामसिंह जाधव, शिवाजी चोरमुले (आष्टा), पदवीधर सेलचे राज्य उपाध्यक्ष विशाल सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य चिटणीस भिमराव पाटील.

NCP Islampur
Satara : राड्यानंतर शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंसमोरच फोडला नारळ; म्हणाले, कायदेशीर असेल ते..

तसेच बाजार समितीचे माजी सभापती अॅड. विश्वासराव पाटील (कणेगाव), नंदकुमार पाटील (पोखर्णी), शशिकांत पाटील (ठाणापुडे), सर्जेराव देशमुख (फार्णेवाडी), राजारामबापू कारखान्याचे संचालक शैलेश पाटील, पोपटराव जगताप (येवलेवाडी), महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव (नरसिंहपूर), तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने (पेठ) यांच्यासह ३० ते ४० अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NCP Islampur
Satara : मुस्‍लीम-दलितांवरील हल्‍ले त्वरित थांबवा; रामदास आठवलेंच्या 'रिपाइं'चा जनआक्रोश

मंगळवारी (ता. २०) सकाळी साडे दहा ते सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमले होते आणि त्यांनी गद्दार दिवस साजरा केला होता. जिल्हाधिकारी यांच्याकडील जमावबंदी आदेश असताना एकत्र जमाव जमवून शिंदे सरकार गद्दार म्हणून घोषणा देत निदर्शन आंदोलन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.