सांगली : सध्या गणेशोत्सव जल्लोषात सुरू आहे. मात्र या आनंदाच्या भरात लेझर किरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे दिसते. त्याचा नेत्रपटलांवर होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन मिरवणुकीत लेझरचा वापर करू नये, सावधगिरी बाळगावी, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.
सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. उद्या (ता. ११) उत्सवाचा पाचवा दिवस आहे. या दिवसापासून विसर्जनास प्रारंभ होतो. पाचव्या, सातव्या, नवव्या आणि अकराव्या दिवशी गणेशमूर्तींचे मिरवणुकीने विसर्जन केले जाते. मिरवणुकीत लेझर किरणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे दिसते. मिरवणुकीत युवावर्ग जल्लोषात नाचताना दिसतो. मात्र त्याच्या डोळ्यांवर लेझरचा विपरीत परिणाम होतो. याबाबत नेत्रतज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.