केंद्र सरकारने इंधनात सध्या दहा टक्के इथेनॉल मिश्रण सक्तीचे केले आहे. २०२५ मध्ये हे प्रमाण २० टक्के करण्याचे उद्दिष्ट सरकारपुढे आहे.
कोल्हापूर : गेल्यावर्षी केंद्र सरकारने (Central Government) इथेनॉल निर्मितीवर घातलेले सर्व निर्बंध हटवले. या नव्या निर्णयामुळे उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) करण्याचा कारखान्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे साखर उद्योगाला (Sugar Industry) मोठा दिलासा मिळाला आहे.