मध्य रेल्वेच्या पॅसेंजर रेल्‍वे गाड्या होणार लवकरच सुरू

मध्य रेल्वेकडून बंद पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी आदेश पारित करण्यात आले आहेत. मिरजेतून धावणा-या आठ पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.
passenger railway
passenger railwaysakal
Updated on
Summary

मध्य रेल्वेकडून बंद पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी आदेश पारित करण्यात आले आहेत. मिरजेतून धावणा-या आठ पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.

मिरज - मध्य रेल्वेकडून (Central Railway) बंद पॅसेंजर रेल्वेसेवा (Passenger Railway) सुरू करण्यासाठी आदेश (Order) पारित करण्यात आले आहेत. मिरजेतून धावणा-या आठ पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. मिरज-कोल्हापूर, पुणे-कोल्हापूर, सांगली-कोल्हापूर, कोल्हापूर-पुणे या गाड्यांना परवानगी मिळाली आहे. मात्र सुरू होण्यासाठी एप्रिल महिन्यापर्यंत प्रवाशांना वाढ पहावी लागणार आहे. रेल्वे बोर्डाकडून पुणे विभागातील २५ पॅसेंजर गाड्यांना परवानगी देण्यात आली. मिरजेतून धावणा-या कोल्हापूर, सांगली व पुणे मार्गावरील आठ पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.

कोरोना आपत्ती काळातील तब्बल दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर पॅसेंजर गाडीस केंद्रिय रेल्वे बोर्डाचा हिरवा सिग्नल मिळाला आहे. सांगली, कोल्हापूर, मिरज मार्गावर पुर्वीच्या तीन पॅसेंजर गाड्या पूर्ववत होणार आहेत. कोल्हापूर-पुणे पॅसेंजर गाडीची ही समावेश आहे.

या सर्व गाड्या पुर्वीच्या वेळेत धावण्याची शक्यता आहे. तर २९ जूनपासून कोल्हापूर-मुंबई (कोयना एक्स्प्रेस), महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-धनबाद, कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस, यशवंतपूर-पंढरपूर, कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस, कोल्हापूर-हरिप्रिया एक्स्प्रेस या गाड्यांचे जनरल बोगी २९ जूननंतर विनाआरक्षण प्रवास करता येणार आहे.

मात्र अद्यापही कोल्हापूर-सोलापूर, मिरज-पंढरपूर, मिरज-बेळगाव, मिरज-परळी या पॅसेंजर गाड्यांना रेल्वे विभागाचा सध्यातरी रेड सिग्नल मिळाला आहे. नुकतेच रेल्वे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी कोल्हापूर-सोलापुर-कलबुर्गी गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली मात्र ही गाडी केंव्हा सुरू होणार याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

या गाड्या सुरू होणार...

  • कोल्हापूर-पुणे (७१४२०)

  • पुणे-कोल्हापूर (७१४१९)

  • मिरज-कोल्हापूर (७१४१७)

  • कोल्हापूर-मिरज (७१४१८)

  • सांगली-कोल्हापूर (७१४२३)

  • कोल्हापूर-सांगली (७१४२४)

  • मिरज-कोल्हापूर (७१४२१)

  • कोल्हापूर-मिरज (७१४२२)

२९ जूनपासून जनरल तिकीट

कोल्हापूर-मुंबई (कोयना एक्स्प्रेस), महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस, कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-धनबाद, कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस, कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस, कोल्हापूर-हरिप्रिया एक्स्प्रेस या गाड्यांना २९ जूनपासून जनरल तिकीट सुविधा मिळणार आहेत. यापूर्वी ही सेवा मिळत नव्‍हती. त्‍यामुळे सामान्‍य रेल्‍वे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्‍याकडे रेल्‍वे प्रवाशी संघटनेने लक्ष वेधले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.