प्रशासनाने पेलले आव्हान ; गर्दीचे गालबोट नको 

1Corona_Danger_19.jpg
1Corona_Danger_19.jpg
Updated on

सांगली : संबध जगाला कारोनाने ग्रासले असताना सांगली जिल्ह्यातील कोरोनोग्रस्तांचा आकडा 26 वरून पुन्हा शून्यांपर्यंत अणण्याचे शिवधनुष्य येथील प्रशासनाने पेलले. परंतु एका बाजूला प्रशासन नियोजनबध्द पध्दतीने कारोनाशी दोन हात करत असताना बॅंका, भाजी-फळ खरेदीसाठी होणारी गर्दी चिंतेत वाढ करणारी आहे. काहींनी नियबाह्यपध्दतीने वागून आम्ही सामुहिक नमाज, प्रार्थना, देव दर्शन करणारच असा हेका सोडण्यास तयार नव्हते.

याबाबत पोलिसांनी योग्य तो कारवाईचा बडगा उगारत संबधितांवर कारवाई केली असली तरी स्वत:च्या हट्टासाठी सर्वांच्या जीवावर उठण्याचे असे प्रकार आता दुर्लक्षीत करून चालणार नाहीत. 'लॉकडाऊन' पुन्हा तीस एप्रिलपर्यंत वाढवल्याने आता प्रत्येकाने स्वंयशिस्तीसह जाबाबदारीने वगाल्या शिवाय 'रेड झोन' मध्ये गेलेल्या सांगलीला कोरोनामुक्तीकडे प्रवासच करता येणार नाही. 
कोरोना वायुवेगाने जगभर ज्या प्रमाणात फोफावू लागला.

त्याचा विचार करता स्वत:ला कोंडून घेण्याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने जवळपास सर्वच जगावर लॉकडाऊन होण्याची वेळ आली. त्यांनतर संपूर्ण देश लॉकडाऊन घोषीत झाला. कोणालाही काही पूर्वकल्पना नसताना एकदमच लॉकडाऊन झाल्याने अनेक प्रश्‍न आ-वासून उभे राहिले. त्याला कोणताही पर्याय नव्हता. यावेळी लोकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा प्रशासनाने जितके जमेल तितके निर्णय युध्दपातळीवर घेतले आणि राबविलेही. मात्र, हे सर्व सुरू असताना भाजी मंडईतून होणारी गर्दी, बॅंकापुढे जमणारी आलोट गर्दी नमाज पठणाचे प्रकार आणि संकष्टीला देवदर्शनासाठी होणारी गर्दी प्रशासनाच्या लढाईला मागे रेटू शकते याची तिळमात्र कल्पनाही संबधिंताना हे असून नये ही बेजबाबदारीच समाजासाठी घातक ठरणार आहे.

लॉकडाऊनच्या सुरवातीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांतच भाजी मंडईतील गर्दी बेकाबू होणार का अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच प्रशासनाने योग्य ती दखल घेत अनेक ठिकाणच्या भाजी मंडई बंद करून घरपोच सेवा सुरू केल्या. याच सोबत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद मिळू लागल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्‍य झाले असले तरी अजूनही काही भागात सुरू असलेले सुशिक्षीतांचे मार्निंग आणि इव्हिनिंग वॉक विचार करायला लावणारे आहे.

एका बाजूला दूध, औषधे आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकांनाना सवलत देवून सोशल डिस्टसिंगच्या माध्यामातून जनतेच्या गरजा भागवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोबतच काही किाणी घरपोचही साहित्य दिले जात आहे. यासर्व गदारोळात रेशन दुकांनांसह बॅंकांसमोर होणारी गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी तर ठरणार नाही ना ? असा प्रश्‍न निर्माण होत असून प्रत्येक ठिकाणी प्रशासनानेच लक्ष देण्यापेक्षा काही ठिकाणी स्वयंशिस्त पाळूनही अनेक समस्या सोडवण्यासह कोरोनाला दूर ठेवण्याचे प्रयोजन प्रत्येकालाच करावे लागणार आहे. 


सूचनांचे काटकोर पालन अवश्‍यक 
रेठरेधरण येथील एक मुंबईत कोरोना बाधित झाल्यानंतर त्याच्या संबधित 24 जणांना मिरजेत आयसोलेटेड करण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच जणांना प्रशासनाच्या सूचनांच्या काटेकोर पालन अत्यावश्‍यक बनले आहे. विनाकरण दुचाकींवरून फिरणे, बॅंका, भाजी-फळे खरेदीसाठी गर्दी करणे आणि मार्निंग, इव्हिनिंग वॉक टाळणे सध्या अतिशय गरजेचे बनले आहे.  

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.