सर्किट हाउसमध्ये पाटील व शेट्टर यांची दोन्ही राज्यांतील पाण्याची देवाण-घेवाण करण्यासंबंधी प्राथमिक चर्चा झाली.
बेळगाव : कृष्णा जल लवादाच्या निवाड्याप्रमाणे कर्नाटकाने (Karnataka) महाराष्ट्राला देय असलेले तीन टीएमसीचे पाणी सोडावे. त्या बदल्यात किटवडे आणि तिलारी धरणाचे पाणी कर्नाटकात वळविले जाईल, असा प्रस्ताव चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) यांच्यासमोर मांडला.