Chandoli Dam : चांदोली धरण क्षेत्रात ढगफुटीसदृश पाऊस; वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर, विक्रमी 9500 क्युसेकने विसर्ग

ढगफुटीसदृश पावसामुळे वारणा धरण (Warna Dam) शंभर टक्के भरले.
Sangli Rain Update Warna Dam
Sangli Rain Update Warna Damesakal
Updated on
Summary

आठ-दहा गावांत व जंगल परिसरात ढगफुटीसारखा पाऊस कोसळला.

सांगली : चांदोली धरण (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात रविवारी (ता. १) दुपारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे वारणा धरण (Warna Dam) शंभर टक्के भरले. त्यानंतर विक्रमी ९५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीत अचानक पाणी आल्याने ‘वारणा’ अनेक ठिकाणी पात्राबाहेर पडली.

Sangli Rain Update Warna Dam
Ratnagiri Rain : गेल्या 50 वर्षांत प्रथमच 'या' गावात मोठा पाऊस; ढगफुटीसदृशस्थिती, जनजीवन विस्कळीत

दुपारी कृष्णा-वारणा संगमावर ती दुथडी भरून वाहत होती. परतीचा पाऊस सुरू झाला आहे. काल जिल्हाभर दमदार पाऊस झाला. चांदोली धरण क्षेत्रात अत्यंत जोराचा पाऊस झाला. आठ-दहा गावांत व जंगल परिसरात ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. ओढे-नाले भरून वाहू लागले. पाणी वारणा नदीत वेगाने मिसळले.

Sangli Rain Update Warna Dam
Dapoli Tourism : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती; पावसामुळं पर्यटकांचा फसला बेत, दापोलीतील पर्यटक माघारी

पावसानंतर धरण झपाट्याने भरले आणि त्यामुळे सायंकाळी ६४०० क्युसेक, तर रात्री उशिरा ९५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला. इतिहासातील हा सर्वांत मोठा विसर्ग ठरला. साहजिकच, त्यामुळे वारणा नदी भरून वाहू लागली. ती आज सकाळी दुथडी भरून वाहत होती.

Sangli Rain Update Warna Dam
Tilari Dam : तिलारी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ; दवंडी पिटवून सतर्कतेचा इशारा, किती झालाय साठा?

काही ठिकाणी पाणी पात्राबाहेर पडले. अचानक पाणी आल्याने शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली. दरम्यान, कालच्या जोरदार पावसानंतर आज जिल्ह्यात सगळीकडेच उघडीप दिली. त्यामुळे छाटणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांनी निःश्‍वास सोडला. पावसाने तळ ठोकला असता तर बागायतदारांची पंचाईत झाली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.