'हे सरकार राज्याचं वाटोळ करणार' ;चंद्रकांत पाटीलांचा आरोप

'हे सरकार राज्याचं वाटोळ करणार' ;चंद्रकांत पाटीलांचा आरोप
Updated on

इस्लामपूर (सांगली) : मराठा आरक्षणाबाबत (maratha reservation)राष्ट्रवादी पंतप्रधानांना (P M)एक कोटी पत्र लिहिणार आहे, ती पत्रे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना लिहिण्याऐवजी पंतप्रधानांना लिहित आहेत. त्यांचा पत्ता चुकला आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांची केंद्राकडे बोट दाखवून चालढकल सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्याचे वाटोळे करायचे ठरवले आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (chandrkant patil)यांनी केला. पेठ (ता. वाळवा) येथे व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेत वनश्री नानासाहेब महाडिक यांचे तैलचित्र अनावरण व भाजप पदाधिकारी यांच्या मेळाव्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार नीलेश राणे, धनंजय महाडिक, आमदार सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, सम्राट महाडिक प्रमुख उपस्थित होते. (chandrakant-patil-criticism-on-mahavikas-aghadi-political-marathi news)

पाटील म्हणाले, " आपल्या खात्याचा सचिव एका घोटाळ्यात अडकला आहे, त्याची फाईल जीएडीने फेटाळली आहे, तरीही त्याला नेमणूक पत्र देतात. हे सरकारच्या ढासळलेल्या व्यवस्थेचे प्रतिक आहे. त्यामुळे हे सरकार राज्याचे वाटोळे करायला निघाले आहे हे सरळ स्पष्ट होते. जे लोक या सिस्टीम विरोधात प्रखरपणे बोलतात त्यांच्या विरोधात सामना मध्ये अग्रलेख लिहिला जातो. सरकार गेले म्हणुन आमच्या पोटात दुखते असा आरोप केला जातो. पण त्यांनी लक्षात ठेवावे केंद्रात पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, अठरा राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमचे आहेत. कशाला आमच्या एका राज्यासाठी पोटात दुखेल. या सरकारने मराठा आरक्षणाबाबत झोपेचे सोंग घेतले आहे. काही झाले तरी केंद्राकडे बोट दाखवून रिकामे होत आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारला चार वर्षे काम करावे लागेल. या चार वर्षांत मराठा समाजाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. संभाजी राजे हे आमचे राजे आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व मान्य करायला कोणतीच अडचण नाही. भाजपचे ते खासदार आहेत की नाही या बाबत राजेंच्या मनात संभ्रम आहे. ऑनपेपर ते भाजपचेच खासदार आहेत. मात्र राजे स्वत:ला राष्ट्रवादी च्या कोट्यातून खासदार झाल्याचे मानतात. त्या वादात आम्हाला जायचे नाही. मात्र संभाजी राजेंनी धरसोड वृत्ती ठेऊ नये. एकदा काय करायचे आहे ते त्यांनी पक्के ठरवावे. ते कधी म्हणतात मी सहा तारखेपर्यंत वाट बघणार, त्यांनी या सरकरची वाट लावा्यची की वाट बघायची?

कधी रणशिंग फुंकले कधी म्हणतात, कोल्हापूरातून मोर्चा काढणार, आता म्हणतात कोविड आहे, मोर्चा काढणे बरोबर नाही. आता म्हणतात, आम्ही कोल्हापूर च्या दसरा चौकात लोकप्रतिनिधींना जनतेद्वारे प्रश्न विचारणार यातून काय आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे काय. त्यामुळे आता भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. पण मराठा समाजाला असे वाटू नये की याला राजकीय रंग चढू लागला आहे. त्यामुळे आम्ही वारंवार ही भुमिका घेतली आहे. हे आंदोलन कुणीही करा आम्ही तुमच्या बरोबर आहे.

राऊतांनी शिवसेना पिंजऱ्यातील वाघ हे मान्य केले

आमची पिंजऱ्यातील वाघाबरोबर मैत्री नसून जंगलातील वाघाबरोबर मैत्री आहे. असे विधान चंद्रकांत दादा पाटील यांनी केले होते. त्यावर आमचा पिंजरा खुला आहे, पिंजऱ्यावर येवून वाघाच्या मिशाला हात लावून दाखवा असे प्रति आव्हान संजय राऊत यांनी दिले होते. त्यावर छेडले असता चंद्रकांतदादा म्हणाले, मी संजय राऊत यांचे आभार मानतो, त्यांनी वाघ पिंजऱ्यात आहे हे मान्य केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.