चंद्रकांत पाटील यांचे सुप्रिया सुळेंना उद्देशून केलेले विधान लज्जास्पद - प्रियांका चतुर्वेदी

खासदार प्रियांका चतुर्वेदी - हिंदुत्व हा शिवसेनेचा श्‍वासच
Chandrakant Patil statement addressed to Supriya Sule is shameful Priyanka Chaturvedi sangli
Chandrakant Patil statement addressed to Supriya Sule is shameful Priyanka Chaturvedi sanglisakal
Updated on

सांगली - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केलेले विधान लज्जास्पद आहे. हा भारतील श्रमिक महिलांचा अपमान आहे. त्याबद्दल पाटील यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्त्या, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. त्या महाविकास आघाडीच्या विकास कामांचा प्रसार आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांच्या दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, माजी प्रमुख बजरंग पाटील, संघटक दिगंबर जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.

त्या म्हणाल्या, ‘‘खासदार सुप्रिया सुळे बुलंद आवाज आहेत. त्या संसदरत्न आहेत. त्यांच्याविषयी अशी अभद्र भाषा वापरणे, ही भाजपच्या नेत्यांची स्त्रियांविषयीची मानसिकता दर्शवते. राज्यसभेत काम करताना मला अनेकदा असे अनुभव आले आणि मी त्याविरोधात आवाजही उठवला. शिवसेना स्त्रियांचा सन्मान करणारा पक्ष आहे. आम्ही जय भवानी आधी म्हणतो आणि मग जय शिवाजी म्हणतो.’’ त्या म्हणाल्या, ‘‘हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपने शिवसेनेवर टीका करणे हास्यास्पद आहे. ते ढोंगी हिंदूत्ववादी आहेत. आम्ही सामाजिक विकासाचे हिंदुत्व करतो. त्यांचे राजकीय लाभाचे, लोभाचे हिंदुत्व आहे. हिंदूत्व आमचे हृदय, श्‍वास, मन आणि मेंदू आहे. काशी, मथुरा, ज्ञानव्यापी हे सगळे मुद्दे देशातील बेरोजगारी, महागाईच्या प्रश्‍नांवर लक्ष विचलीत करण्यासाठी पुढे आणलेले आहेत. त्याच्या जनतेवर परिणाम होणार नाही.

खासदार संजय राऊत यांनी टीका केली की केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरु होतो. सरकार पडण्याच्या तारखा सांगितल्या जातात. याला शिवसेना पुरून उरली आहे.’’ त्या म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्र देशाचा आर्थिक कणा आहे. त्यामुळे केंद्रातील सत्तेचे केंद्रीकरण करू पाहणारे सरकार महाराष्ट्रावर सतत हल्ले करत आहे. महाविकास आघाडीचे सरकार त्याला पुरून उरले असून विकासात घेतलेली आघाडी लक्षवेधी आहे. कोरोना, महापूर या संकटांना समर्थपणे तोंड देत राज्य पुढे जात आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘नंबर एक मुख्यमंत्री’ म्हणून गौरव होतोय. शिवसेनेचा हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही नेतोय. कोल्हापूर येथील जिल्हा प्रमुखांना राज्यसभेची उमेदवारी देऊन पक्षाने कट्टर शिवसैनिकाचा गौरव केला आहे. या पद्धतीने आम्ही पक्षाची बांधणी करू, विस्तार करू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()