Chandurbajar: कृषी केंद्रांची माहितीच नाही! चांदूरबाजार तालुका कृषी कार्यालयाचा अनागोंदी कारभार

तालुक्यात एकूण १५२ कृषिकेंद्रे असून त्यापैकी १३९ सुरू आहेत.
sakal exclusive
sakal exclusivesakal
Updated on

Chandurbajar News : तालुक्यात एकूण कृषी केंद्रांपैकी, किती कृषी केंद्रांचे परवाने नूतनीकरणासाठी गेले आहेत, याची माहिती तालुका कृषी कार्यालयात नसल्याने कृषी केंद्र तपासणी केली जाते की नाही?, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

तालुक्यात एकूण १५२ कृषिकेंद्रे असून त्यापैकी १३९ सुरू आहेत. तालुका पातळीवर कृषी केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी देखरेखीमध्ये इतर अधिकारी नजर ठेवून असतात. वेळोवेळी कृषी केंद्रांची तपासणी करून कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना योग्य दरात बियाणे, खते दिली जातात की नाही व प्रमाणित खते, बियाणे कृषी केंद्रांमधून विकले जातात की नाही, यावरसुद्धा लक्ष असते.

कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये, यासाठी हे अधिकारी कृषी केंद्रांना वेळोवेळी भेटी देऊन त्यांच्यावर देखरेख ठेवत असतात. असे असताना तालुक्यामध्ये किती कृषी केंद्रांचे परवाने नूतनीकरणासाठी गेलेत व ती केव्हापासून, असे तालुका कृषी अधिकारी यांना विचारले असता याबाबत पूर्ण माहिती नसल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले. यावरून तालुक्यात कृषी केंद्रांवर देखरेख कशी असेल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चांदूरबाजार तालुक्यामध्ये किती कृषी केंद्रांचे परवाने नूतनीकरणासाठी गेलेत, याबाबत सध्या पूर्ण माहिती उपलब्ध नसून, माहिती काढून सांगतो - शिवाजी दांडेगावकर, तालुका कृषी अधिकारी. (Latest Marathi News)

sakal exclusive
Mushfiqur Rahim Video : विकेट चुकवायला गेला अन् विचित्र पद्धतीने आऊट झाला... व्हिडिओ पाहून तुम्हाला बसेल धक्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.